Delhi Excise Policy Case : तेलंगणाचे माजी मु्ख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandra Shekhar Rao) यांच्या कन्या आणि भारत राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता (K. Kavita) आता ईडीच्या रडारवर आल्या आहेत. कविता यांच्या हैदराबाद येथील घरी ईडीच्या पथकाने छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात (Delhi Excise Policy Case) त्यांचे नाव आले होते. त्यामुळे ईडी आणि सीबीआयने त्यांची चौकशीही केली होती. त्यानंतर आता थेट छापे टाकण्यात आले आहेत. ईडीच्या पथकातील अधिकारी घराती तपासणी करत आहेत.
मोठी बातमी ! दिल्लीतील दारू घोटाळ्यात CBI ची केजरीवालांना नोटीस; रविवारी मोठ्या घडामोडी
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात भारत राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता यांची याआधी नऊ तास चौकशी झाली होती. ईडीने त्यांच्यावर दक्षिण गटाचा हिस्सा असल्याचा आरोप केला होता. या गटात हैदराबादमधील व्यापारी आणि अन्य राजकीय नेत्यांचा समावेश आहे. ज्यांनी दिल्लीतील सत्ताधारी पार्टीला शंभर कोटी रुपये लाच पाठवली होती.
आमदार कविता यांची चौकशी केल्यानंतर ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या चौकशी संदर्भात माजी चार्टर्ड अकाउंटंचीही चौकशी केली होती. ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 8 समन्स पाठवले आहेत. परंतु, केजरीवाल मात्र चौकशीसाठी ईडीसमक्ष हजर झाले नाहीत. त्यांच्याकडून ईडीला उत्तरे दिली जात आहेत मात्र ते स्वतः अधिकाऱ्यांसमोर हजर राहत नाहीत. एका समन्सनंतर त्यांनी चौकशीसाठी ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावली होती.
राजधानी दिल्लीत जोरदार भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 5.6 तीव्रतेची नोंद; नागरिकांमध्ये घबराहट
ईडीच्या चार्जशिटमध्ये केजरीवालांचे नाव
मद्य घोटाळ्याप्रकरणात केजरीवाल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले मनिष सिसोदिया हे अटकेत आहेत. त्यांना अद्यापही जामिन मिळालेला नाही. तर ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात केजरीवाल यांचे नाव आहे. या मद्य घोटाळ्यात ईडीबरोबर सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सीबीआयने चौकशीसाठी बोलविले होते. परंतु केजरीवाल हे चौकशीसाठी जात नाहीत.