DANA Cyclone in Odisha : उत्तर बंगालच्या खाडीतून उठलेल्या दाना चक्रीवादळानं रौद्र (Dana Cyclone) रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. या वादळाचा परिणाम आसपासच्या राज्यांत जाणवू लागला आहे. ओडिशात (Odisha News) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. यामुळे समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांत भीतीचे वातावरण आहे. या वादळामुळे अनेक ठीकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार दाना वादळ 24 आणि 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्री गतीमान झाले आहे. ओडिशातील पारदीपपासून जवळपास 50 किलोमीटर पूर्व-उत्तरपूर्व, धामरापासून 40 किलोमीटर दक्षिण-दक्षिणपूर्व आणि पश्चिम बंगालपासून (West Bengal) 160 किलोमीटर दक्षिण-पश्चिम भागात स्थित आहे.
या वादळाची स्थिती पाहता प्रशासनाने उपाययोजनेस सुरुवात केली आहे. ओडिशात जवळपास 385 बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. 20 एनडीआरएफ, 51 ओडीआरएफ, 220 अग्निशमन दल आणि 95 ओडिशा वनविकास विभागाचे पथक येथे तैनात आहेत.
Odisha Train Accident : बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर शवगृह बनलेल्या ‘त्या’ शाळांवर हातोडा
आतापर्यंत जवळपास 2 हजार 131 गावे, 12 शहरी स्थानिक ठीकाणे आणि स्थानिक संस्थांतील 55 प्रभागांतील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. 4 हजार 756 मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 6 हजार 454 पाळीव प्राण्यांना मदत केंद्रांत आणण्यात आले. 213 चिकित्सा पथक नियुक्त केले आहेत. जनावरांसाठी 120 पशु चिकित्सा पथके तैनात केली आहेत.
ओडिशात आतापर्यंत तीन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं आहे. सात हजारांहून अधिक मदत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. 2 हजार 300 पेक्षा जास्त गर्भवती मातांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं आहे. दाना वादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे 750 रेल्वे आणि 400 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
तिरुपती लाडू वादानंतर ओडिशा सरकार सतर्क, जगन्नाथ मंदिरासाठी उचललं मोठे पाऊल