Download App

Elections Results : राजस्थानात वारं फिरलं? भाजपला फक्त 14 जागांची आघाडी; काँग्रेसची टक्कर

भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या राजस्थानातही वारं फिरलं असून काँग्रेस जोरदार टक्कर देताना दिसत आहे.

Rajasthan Election Result Live 2024 : सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून निकाल हाती येत आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत विरोधकांची इंडिया आघाडी भाजपला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. ज्या पश्चिम बंगालमध्ये जास्त जागा मिळतील असा अंदाज भाजप नेते व्यक्त करत होते तेथे भाजपाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. आधीच्या जागा सुद्धा टिकतील की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशातही समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने भाजपाला जोरदार टक्कर दिली आहे. इतकेच काय तर भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या राजस्थानातही वारं फिरलं आहे.

राज्यातील 25 जागांपैकी फक्त 14 जागांवर भाजपला आघाडी मिळाली आहे तर आठ जागांवर काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. राजस्थानात भाजप आणि काँग्रेस याच्यात अटीतटीची लढाई सुरू आहे. भाजपला फक्त 14 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेसने 9 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अन्य तीन जागांवर सीपीआय (एम) आणि बाप पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. याआधी भाजप 14 जागांवर आघाडीवर होता.

follow us