Download App

मोदींची भारतीयांना गॅरंटी! माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थेत

PM Modi Promises to Indian People : 2024 नंतर देशात जेव्हा एनडीएचे सरकार येईल त्यावेळी माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते IECC कॉम्प्लेक्स ‘भारत मंडपम’चे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले, गेल्या 5 वर्षात देशातील साडेतेरा कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. आंतरराष्ट्रीय संस्था असेही म्हणत आहेत की भारतातील गरिबी संपण्याच्या मार्गावर आहे. मागील 9 वर्षात सरकारने घेतलेले निर्णय आणि राबविलेली धोरणे देशाला योग्य दिशेने घेऊन जात असल्याचे यावरून दिसून येत आहे.

Inside Story : मोदी सरकार संपूर्ण बहुमतात… तरीही विरोधकांचा अविश्वास प्रस्तावाचा अट्टाहास का?

विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले, काही लोकांची चांगली कामे थांबविण्याची आणि विनाकारण टीका टिप्पणी करण्याची प्रवृत्ती आहे. कर्तव्य पथचे बांधकाम सुरू होते त्यावेळीही त्यावेळी वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर बातम्या छापल्या जात होते. या मुद्द्यावर ते लोक कोर्टातही गेले होते. पण त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता तेच कोर्टात जाणारे लोक त्याला चांगले म्हणत आहेत.

या कन्हेन्शन सेंटरमध्ये 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान 18 वी G 20 बैठक होणार आहे. सरकारी एजन्सी इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशन (ITPO) चे हे संकुल 123 एकरमध्ये विस्तारलेले आहे. 7 हजार लोकांपेक्षा जास्त लोक एकाच वेळी बसू शकतील इतकी आसन क्षमता आहे. या सेंटरमध्ये तीन हजार आसन क्षमतेचे अॅम्फीथिएटरही आहे. साडेपाच हजारहून आधिक वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

कर्नाटकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात? 11 असमाधानी आमदारांचा लेटर बॉम्ब; काँग्रेसमध्ये खळबळ

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावरून 2024 नंतरही देशात भाजपचेच सरकार येणार असल्याचे दिसून येत आहे. भाजप नेतेही तसा दावा कायमच करत असतात. आता त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us