काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ दिग्गज नेत्याच्या मुलाचा भाजपात प्रवेश

Anil Antony Joins BJP : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी (A. K. Antony) यांचा मुलगा अनिल अँटनी (Anil Antony) यांनी आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजप विरोधात रान उठवणाऱ्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ए. के. अँटनी हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जातात तरी देखील […]

Anil Antony

Anil Antony

Anil Antony Joins BJP : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी (A. K. Antony) यांचा मुलगा अनिल अँटनी (Anil Antony) यांनी आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजप विरोधात रान उठवणाऱ्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ए. के. अँटनी हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जातात तरी देखील त्यांना त्यांच्या मुलाचा भाजपातील प्रवेश रोखता आला नाही. या पक्षप्रवेशावेळी के. मुरलीधरन, केरळ भाजपा अध्यक्ष के. सुरेंद्रन उपस्थित होते.

सन 2002 मधील गुजरात दंगली आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या डॉक्यूमेंट्रीवरील वादानंतर अनिल अँटनी यांनी जानेवारी महिन्यातच काँग्रेसला राम राम ठोकला होता. अनिल अँटनी यांचे वडील ए. के. अँटनी काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय रक्षामंत्री होते. तसेच ते केरळ राज्याचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. ए. के. अँटनी हे काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांत गणले जातात.

काँग्रेस सोडण्याआधी अनिल अँटनी हे केरळमध्ये काँग्रेसचे  सोशल मिडीयाचे काम पाहत होते. त्यांनी पार्टी सोडण्याआधी बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीला भारताविरोधात पक्षपातपूर्ण म्हटले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र तरीही अनिल यांनी कोणतीही भीती न बाळगता आपली मते व्यक्त केली होती.

राज्यसभा सभापतींनी घेतली दिग्विजय सिंह यांची फिरकी, राज्यसभेत गदारोळ, कामकाज तहकूब

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यांचे भाजपात स्वागत करताना म्हटले की अनिल अँटनी हे एक बहुआयामी व्यक्ती आहेत. त्यांचे विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांसाराखेच आहेत.

Exit mobile version