Download App

राजस्थान काँग्रेसमध्ये खळबळ! सचिन पायलट अखेर ‘तो’ निर्णय घेण्याच्या तयारीत

Sachin Pilot vs Ashok Gehlot : राजस्थानात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या आधी सत्ताधारी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि माजी मुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यात वाद पेटला आहे. भाजप नेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवर पायलट ठाम आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होऊन या दोन नेत्यांतील वाद मिटल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, हा दावा खोटा ठरताना दिसत आहे.

आता तर अशी माहिती समोर येत आहे की पायलट राजस्थानच्या राजकारणात लवकरच खळबळ उडवून देणार आहेत. सूत्रांच्या माहितीवर विश्वास ठेवला तर पायलट याच महिन्यात नवीन पार्टी लाँच करू शकतात.

https://letsupp.com/national/allahabad-high-court-ordered-to-check-the-horoscope-of-victim-lucknow-university-should-check-girl-is-manglik-or-not-53625.html

पायलट निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या संस्थेचीही मदत घेत आहेत. न्यूजलाँड्रीच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे, की सचिन पायलट यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. या संस्थेच्या वरिष्ठ सूत्रांनी न्यजूलाँड्रीला सांगितले की पायलट यांनी काही काळाआधी संस्थेची मदत घेतली होती. पायलट दोन ते तीन आठवड्यात स्वतःचा राजकीय पक्ष लाँच करू शकतात.

नाव न छापण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितले, की पायलट यांचा हेतू आता स्पष्ट आहे. त्यांनी निर्णय घेतला आहे की ते त्यांचे प्रयत्न पुढे सुरू ठेवतील आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाहीत. पायलट सध्या सावधगिरीने पावले टाकत आहे. त्यांच्यावर काही प्रश्न उपस्थित होतील अशी स्थिती येऊ नये याचीही ते काळजी घेत आहेत. या सगळ्या घडामोडींवरून असे दिसून येत आहे की पायलट लवकरच नवीन पक्ष स्थापन करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

2024 च्या निवडणुकीचे निकाल काय? राहुल गांधींनी केलं मोठं भाकीत

तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली

दरम्यान, सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील वाद वाढत असल्याचे पाहून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हालचाली केल्या. दोन्ही नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत दोन्ही नेत्यांमधील वाद मिटला असून त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेस राज्यात विधानसभेच्या निवडणुका लढविल असे सांगितले. या बैठकीत काय तोडगा निघाला याबाबत मात्र त्यांनी काहीच सांगितले नाही. त्यावेळीच काहीतरी गडबड आहे असे जाणवले होते.

Tags

follow us