Download App

गुडन्यूज! मान्सूनची आज अंदमानात एन्ट्री; यंदा धो-धो बरसणार

मान्सून आज अंदमानात दाखल होत आहे. त्यानंतर ३१ मे रोजी केरळात दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली. 

Monsoon Arrival Update : देशात मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाळ्याने नागरिक (Monsoon Arrival Update) हैराण झाले आहेत. तापमान प्रचंड वाढले आहे. उत्तर भारतात तर तापमान ४७ अंशांपर्यंत पोहोचले आहे. येथील राज्यात हवामान विभागाने उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी घरातच रहावे अशा सूचना दिल्या आहेत. या उष्णतेतून कधी सुटका होणार याची वाट नागरिक पाहत असतानाच दिलासा देणारी बातमी आली आहे. मान्सून आज अंदमानात दाखल होत आहे. त्यानंतर ३१ मे रोजी केरळात दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली.

Monsoon Arrival Update : दिलासा मिळणार ! ‘या’ दिवशी केरळात दाखल होणार मान्सून

मागील वर्षी देशात 8 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. मात्र यावर्षी दक्षिण अंदमानच्या समुद्रात 19 मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे यंदा मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे. तर या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वी वर्तवला होता. गेल्या महिन्यात (एप्रिल 2024) भारतीय हवामान विभागाने पहिला अंदाज वर्तवला होता त्यामध्ये यंदा देशात 106 टक्के पाऊस पडणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

एल निनो कमजोर होत असल्याने देशात यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर आता भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्रात देखील यावेळी मान्सून चांगला राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Weather Update : कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वातावरणात मोठा बदल

दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होतो. पण यंदा एक दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल होईल. २८ मे ते ३ जून दरम्यान मान्सून भारताच्या मुख्य भूमीत दाखल होण्याची शक्यता आहे. केरळात येण्याआधी मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर येतो. दरवर्षी २१ मे रोजी या बेटांवर मान्सूनचे आगमन होत असते. यावेळी मात्र दोन दिवस आधीच मान्सून येथे येत आहे. मागील वर्षातही याच दिवशी मान्सून बेटांवर धडकला होता. परंतु, केरळमध्ये येण्यास उशीर झाला होता. केरळमध्ये ८ जून रोजी मान्सून दाखल झाला होता. यंदा या परिस्थितीत काही बदल होतो का त्यावर मान्सूनचे चक्र अवलंबून राहणार आहे.

follow us

वेब स्टोरीज