‘आता आमची पदके गंगेत टाकणार’; पहिलवानांनी घेतला नवा पवित्रा

Wrestlers Protest : दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या पहिलवानांनी आता केंद्र सरकारविरोधात आणखी आक्रमक पाऊल उचलले आहे. पहिलवान आता त्यांना मिळालेली पदके गंगा नदीत विसर्जित करतील आणि आमरण उपोषणास बसतील. याबाबत कुस्तीपटू विनेश फोगाटने ट्विटरवर एक निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे, की पहिलवान हरिद्वारला जातील आणि सायंकाळी 6 वाजता पदक गंगा नदीत विसर्जित करतील. […]

FxNCYR9XoAAK4On

मोर्चा काढण्यासाठी कुस्तीपटूंनी पोलिसांचे बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला.

Wrestlers Protest : दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या पहिलवानांनी आता केंद्र सरकारविरोधात आणखी आक्रमक पाऊल उचलले आहे. पहिलवान आता त्यांना मिळालेली पदके गंगा नदीत विसर्जित करतील आणि आमरण उपोषणास बसतील.

याबाबत कुस्तीपटू विनेश फोगाटने ट्विटरवर एक निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे, की पहिलवान हरिद्वारला जातील आणि सायंकाळी 6 वाजता पदक गंगा नदीत विसर्जित करतील. ही पदके आमचे जीवन आहेत, आमचा आत्मा आहे. यानंतर आम्ही इंडिया गेट येथे आमरण उपोषण सुरू करणार आहोत. विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अन्य पहिलवान तसेच महिला अॅथलीट यांच्यावरील अत्याचारासंदर्भात भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण सिंह यांचा विरोध करत आहेत.

Wrestlers Protest : ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, दिल्ली महिला आयोगाने घेतली दखल…

यासाठी पहिलवानांनी मागील 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी येथे विदारक दृश्य पाहण्यास मिळाले. पहिलवानांच्या विरोध मार्चवर पोलिसांनी कारवाई केली. हे पहिलवान संसद भवनाच्या दिशेने निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. आंदोलकांनी सुरक्षा घेरा तोडण्याचा प्रयत्न केला असता जोरदार संघर्ष सुरू झाला. पहिलवान आणि पोलिसात हाणामाऱ्या झाल्या.

दरम्यान, दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर करण्यात आलेल्या कारवाईची दिल्ली महिला आयोगाकडून दखल घेण्यात आलीय. ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी कुस्तीपटूंसह त्यांच्या कुटुंबियांवर कारवाई केलीय, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी केलीय. यासंदर्भात पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी त्यांनी पत्र लिहिलं आहे.

स्वाती मालीवाल म्हणाल्या, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली आणि त्यांना आज जबरदस्तीने ताब्यात घेतले. हे पाहून दिल्ली महिला आयोगाला खूप दुःख झाले आहे.

Exit mobile version