Download App

NCERT बोर्डचा अभ्यासक्रम होणार नवीन शैक्षणिक धोरणानुसार; केंद्रीय शिक्षण खात्याची माहिती

  • Written By: Last Updated:

एनसीईआरटी बोर्डचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा बदल करण्यात येणार आहे. याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिली आहे. यामुळे एनसीईआरटी बोर्डच्या सर्व पुस्तकांमध्ये बदल केला जाणार आहे. हा नवीन बदल 2024-2025 साली लागू केला जाणार असल्याची माहिती आहे.

शिक्षण मंत्रलायाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबती माहिती दिलेली आहे. नवीन अभ्यासक्रम हा 2024-2025 पासून लागू केला जाणार असल्याची शक्यता आहे. यावर आधीपासूनच काम सुरु करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षातील कोरोनामुळे आता डिजीटल पद्धतीने देखील शिक्षण दिले जात आहे.

जन्माची अद्दल घडविणार; अजितदादांच्या इशाऱ्यानंतर माजी आमदाराच्या पोटात गोळा

त्यामुळे विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षणासाठी देखील कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नवीन अभ्यासक्रमातील पुस्तके ही डिजीटल रुपामध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. या माध्यमातून विद्यार्थी कोणतेही पुस्तक डाउनलोड करु शकतील. यासाठी एक इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क विकसित केले जाणार आहे.

Tags

follow us