मोठा निर्णय! पाठ्यपुस्तकांमध्ये India ऐवजी लिहलं जाणार भारत, बदलाला NCERT ची मंजूरी

NCERT : एनसीईआरटी (NCERT) म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांनी एक महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्याच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आता देशाचे नाव इंडिया नाही तर भारतच असणार आहे. हा बदल करण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला होता. त्याला एनसीईआरटीने मंजुरी दिली आहे. (NCERT Committee Recommends Replacing India With ‘Bharat’ In All School Textbooks) […]

NCERT

NCERT

NCERT : एनसीईआरटी (NCERT) म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांनी एक महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्याच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आता देशाचे नाव इंडिया नाही तर भारतच असणार आहे. हा बदल करण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला होता. त्याला एनसीईआरटीने मंजुरी दिली आहे. (NCERT Committee Recommends Replacing India With ‘Bharat’ In All School Textbooks)

शालेय पाठ्यपुस्तकांमध्येही दिसणार ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’

विद्यार्थ्याच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आता देशाचे नाव इंडिया नाही तर भारत करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये म्हटलं आहे की, शास्त्रीय इतिहासा ऐवजी प्राचीन इतिहास अवलंबण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. तसेच पुस्तकं आणि पाठ्यपुस्तकांमध्ये देखील देशाचे नाव इंडिया नाही तर भारत करण्यात यावं अशी देखील मागणी करण्यात आली. त्यानुसार त्याला एनसीईआरटीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्याच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आता देशाचे नाव इंडिया नाही तर भारतच असणार आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

‘इंडिया’ विरूद्ध ‘भारत’ हा वाद काय?

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी इंडिया विरूद्ध भारत असा वाद सुरू झाला होता. त्याला कारण म्हणजे विरोधकांच्या युपीए या आघाडीने आपल्या नव्या आघाडीला इंडिया हे नाव दिलं होतं. त्यामुळे सत्ताधारी भाजपने विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्याच दरम्यान त्यांनी इंडिया आणि भारत हा वाद देखील सुरू केला. त्यात इंडिया हे देशाचं मूळ नाव नाही. ते इंग्रजांनी दिलेलं आहे. ते गुलामीचं प्रतिक आहे. त्यामुळे भारत हेच देशाचं नाव वापरण्यात यावं असा आग्रह भाजपने धरला.

Deva Release Date: रोज दोन पाकिटे सिगारेट ओढणारा शाहिद कपूरचा ‘देवा’ सिनेमामधील फर्स्ट लूक प्रदर्शित

त्यावरून त्यांनी कॉंग्रेस आणि इतर पक्षांवर टीका केली. दरम्यान याचवेळी सत्ताधारी भाजपने जी-20 या परिषदेच्या बैठकीसाठी इतर देशांना देण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रिकेवर देखील देशाचे नाव इंडिया नाही तर भारतच करण्यात आले होते. त्यावरून देखील गदारोळ निर्माण झाला होता. तसेच जी-20 या परिषदेमध्ये देखील पंतप्रधान मोदींच्या पोडीयमवर भारतच लिहिण्यात आले होते.

Exit mobile version