Download App

ब्रेकिंग : सस्पेन्स संपला! एकाच सत्रात होणार NEET PG परीक्षा; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

  • Written By: Last Updated:

NEET PG 2025 Can’t Be Held In Two Shifts Says Supreme Court : NEET PG 2025 परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठे आदेश देत NEET PG 2025 परिक्षा परीक्षा दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफटमध्ये घेण्याचे निर्देश राष्ट्रीय परीक्षा मंडळाला दिले आहेत. दोन शिफ्टमधील परिक्षांमुळे मनमानी निर्माण होईल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत या परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत. NEET PG 2025 परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्याच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) वरील आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता NEET UG प्रमाणे, NEET PG परीक्षा देखील एकाच शिफ्टमध्ये घेतल्या जाणार आहेत.

….तर असमानता आणि मनमानी निर्माण होईल

परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतल्याने प्रश्नांच्या काठिण्य पातळीत फरक होऊ शकतो, ज्यामुळे असमानता आणि मनमानी निर्माण होईल असे निरीक्षणदेखील न्यायालयाने सुनावणीवेळी नोंदवले. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिकांची काठीण्य पातळी कधीही पूर्णपणे सारखीच म्हणता येणार नाही. त्यामुळे एकसमान मानके सुनिश्चित करण्यासाठी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेणे आवश्यक आहे. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट (NEET-PG) 2025 ही परीक्षा 15 जून रोजी दोन शिफ्टमध्ये संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने होणार असून, या परिक्षांचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर केला जाणार आहे.

टेन्शनचं संपलं राव! WhatsApp वर येणार ‘Log Out’ फीचर; सतत येणाऱ्या मेसेजमधून मिळणार ‘ब्रेक’

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी दिलासा

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण आता त्यांना इतर कोणत्याही शिफ्टच्या कठीण किंवा सोप्या पेपर्सची चिंता करावी लागणार नाही. सर्व उमेदवार एकाच वेळी समान प्रश्नांसह परीक्षा देतील, ज्यामुळे निकालांची निष्पक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे. नीट पीजीच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतल्याने पारदर्शकता राहील आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल, असही कोर्टाने म्हटलं आहे.

follow us