NEET Result: एनटीएचे मोठे अधिकारी आता आले रडारवर ! शिक्षणमंत्र्यांचा थेट कारवाईचा इशारा

  • Written By: Published:
NEET Result: एनटीएचे मोठे अधिकारी आता आले रडारवर ! शिक्षणमंत्र्यांचा थेट कारवाईचा इशारा

Education MinisterDharmendra Pradhan on NEET Result : नीट परीक्षेतील गुणांच्या गोंधळावरून अखेर नवे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) अधिकाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा दिला आहे. नीटमधील (NEET Result) कोणत्याही प्रकारची अनियमितता सहन केली जाणार नाही. मुलांच्या भविष्याशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही. यात एनटीएचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे प्रधान यांनी रविवारी म्हटले आहे.


प्रतिक्षा संपली! ‘MHT CET’ निकाल जाहीर, ‘या’ लिंकवर जाऊ पाहता येणार निकाल


मंत्री प्रधान म्हणाले, नीट परीक्षा आयोजित करणाऱ्या एनटीएमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 1,563 उमेदवारांच्या फेरपरीक्षेचे आदेश देण्यात आले आहेत. दोन ठिकाणी काही अनियमितता समोर आल्या आहेत. मी विद्यार्थी आणि पालकांना आश्वासन देतो की सरकारने हहे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे, कोणत्याही दोषींना सोडले जाणार नाही, त्यांना कठोरात कठोर कारवाई केली जाईल.

इव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? निवडणूक आयोगाच्या खुलाशाने अनेकांना तोंडावर आपटले

एनटीएने गुरुवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की NEET-UG परीक्षेत जास्त गुण मिळालेल्या 1,563 उमेदवारांचे गुणपत्रक रद्द केले जाईल आणि उमेदवारांना 23 जून रोजी पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. या परीक्षेचा निकाल येत्या 30 जूनला जाहीर केला जाईल.

नीटमध्ये काय गोंधळ झालाय ?

2024 च्या NEET-UG परीक्षेतील गुणांवर अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. NEET-UG बाबत काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यंदा विक्रमी 67 उमेदवारांनी पूर्ण गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला आहे. सहा परीक्षा केंद्रांवर परीक्षांना उशीर झाल्यामुळे वाया गेलेल्या वेळेची भरपाई करण्यासाठी 1,500 हून अधिक विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस गुणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तर गुजरातमधील गोध्रा येथील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे पेपर हे शिक्षकांनी लिहिले असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येऊन पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube