NEET पेपर लीक प्रकरणात होणार CBI ची एंट्री? सर्वोच्च न्यायालयाने NTA ला पाठवली नोटीस

NEET पेपर लीक प्रकरणात होणार CBI ची एंट्री? सर्वोच्च न्यायालयाने NTA ला पाठवली नोटीस

NEET Paper Leak Case : NEET-UG परीक्षा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह (Social Media) देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. NEET-UG परीक्षामध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात NEET-UG च्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांची सीबीआय (CBI) चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या प्रकरणात केंद्र आणि NTA कडून उत्तर मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. हितेन सिंग कश्यप यांच्या या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि NTA कडून उत्तर मागितले आहे.

हितेन सिंग कश्यप यांनी या याचिकेत सीबीआय चौकशी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सीबीआय आणि बिहार सरकारकडून दोन आठवड्यांत उत्तर मागितले आहे तसेच इतर प्रलंबित जनहित याचिकांवर 8 जुलै रोजी विचार केला जाईल, जेव्हा सर्वोच्च न्यायालय उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर पुन्हा कामकाज सुरू होईल असं ही न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

1 हजाराहून अधिक उमेदवारांचे गुण रद्द

तर या प्रकरणात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केंद्र आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएने सांगितले की त्यांनी एमबीबीएस आणि अशा इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी टेस्ट दिलेल्या 1,563 उमेदवारांना दिलेले ग्रेस मार्क्‍स रद्द करण्यात आले आहे. तर केंद्राकडून म्हणण्यात आले आहे की, त्यांच्याकडे दोन पर्याय आहे एक तर पुन्हा तपासणी किंवा उमेदवारांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्क्‍स रद्द करणे. तसेच नोटीसमध्ये म्हटले आहे की, NEET च्या निकालात वाढीव गुण मिळालेल्या 1,563 उमेदवारांची 23 जून रोजी पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षा 24 लाख उमेदवारांनी दिली होती

NEET-UG साठी 5 मे रोजी 4,750 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.माहितीनुसार ही परीक्षा 24 लाख उमेदवारांनी दिली होती. या परीक्षेचा निकाल 14 जून रोजी जाहीर होणार होता मात्र 4 जून रोजी जाहीर करण्यात आला होता.

स्मार्टफोन एक व्यसनच, सुटकेसाठी Apple चे CEO टिम कूकने सुचवले ‘हे’ AI टूल

माहितीसाठी जाणून घ्या की, संपूर्ण देशात सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये MBBS, BDS, आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी NTA द्वारे NEET-UG परीक्षा घेतली जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज