NEET re-exam paper also leak in Gujarat three days in advance Rohit Pawars sensational allegation : एकीकडे देशामध्ये मे महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या नीट पेपरफुटीवरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. त्यात आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा घेण्यात आलेल्या नीट परिक्षेबाबतही खळबळजनक आरोप केला आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
NEET पेपर लीक झाल्यानंतर जी नवीन फेरपरीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेचा पेपर देखील ३ दिवस आधीच गुजरातमधून फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे सत्य असेल तर खूप अवघड आहे..तपास यंत्रणानी यासंदर्भात त्वरित खुलासा करावा आणि पेपर फुटला असेल तर कुठल्याही दबावाला बळी न पडता यामधील रॅकेट उघडकीस आणावं, ही विनंती! या पेपरफुटीसंदर्भात पुढं आलेले स्किन शॉट, मेल, संभाषण हे सगळं सोबत दिलेल्या लिंकवर गेल्यास पहावयास मिळेल. असं म्हणत रोहित पवार या पेपरफुटीचा दावा करणारे काही कागदपत्र देखील शेअर केले आहेत.
#NEET पेपर लीक झाल्यानंतर जी नवीन फेरपरीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेचा पेपर देखील ३ दिवस आधीच गुजरातमधून फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे सत्य असेल तर खूप अवघड आहे..!
तपास यंत्रणानी यासंदर्भात त्वरित खुलासा करावा आणि पेपर फुटला असेल तर कुठल्याही दबावाला बळी न पडता यामधील… pic.twitter.com/qFt1NPgsyQ— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 29, 2026
