Download App

मोठी बातमी! NEET UG वर्षातून दोनदा होणार नाही, उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

  • Written By: Last Updated:

NEET UG Exam : NEET-UG वर्षातून दोनदा अनेक शिफ्टमध्ये घेण्याच्या मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) बुधवारी फेटाळली आहे. या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, हा प्रशाकीय विषय असून यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय (Devendra Kumar Upadhyay) आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला (Tushar Rao Gedela) यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.

याचिकाकर्त्याने जेईई मेन्स (JEE Mains) वर्षातून दोनदा अनेक शिफ्टमध्ये घेण्याची मागणी केली होती. ही याचिका फेटाळून लावताना, दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, याबाबत विचार करण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. हा सरकाचा धोरणात्मक निर्णय आहे. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याला सागितले की, संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करा आणि जर याबाबात अधिकाऱ्यांना अर्ज देण्यात आले असेल तर त्यांनी याबाबत विचार करावा आणि कायद्यानुसार निर्णय द्यावा असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

या याचिकेच याचिकाकर्त्याने म्हटले होते की, जेईई (मुख्य) परीक्षा अनेक शिफ्टमध्ये घेण्यात यावी. विद्यार्थ्यांना मानसिक दबाव कमी करण्यासाठी आणि त्यांचे गुण सुधारण्यासाठी त्यांना अनेक संधी देण्यात याव्या असं याचिकेकार्त्यांने या याचिकेत म्हटले होते.

Shirdi Traffic Update : शिर्डीकरांसाठी महत्वाची बातमी…वाहतूक मार्गात झालाय बदल 

यावर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, इतर अनेक स्पर्धात्मक परीक्षा आहेत ज्यामध्ये उमेदवारांना अनेक संधी मिळत नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

follow us