Pakistan News : दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान जगाच्या (Pakistan News) नकाशावर आल्यापासूनच भारताला डोकेदुखी ठरला आहे. दोन्ही देशांतील शत्रुत्व आजही कायम आहे. जम्मू काश्मीरमध्ये उभारण्यात येत असलेल्या दोन हायड्रो प्रोजेक्टचा वाद देखील जुनाच आहे. जागतिक बँकेने (World Bank) यासाठी एका तज्ज्ञाची नियुक्ती देखील केली होती. या तज्ज्ञाने आता भारताची बाजू बरोबर असल्याचे म्हटलं आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. भारत सरकारने या जागतिक बँकेच्या तज्ज्ञांच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सन 1960 मधील सिंधू जल करारावर (Indus Water Treaty) भारत आणि पाकिस्तान मध्ये तीव्र मतभेद आणि वाद निर्माण झाले होते. या परिस्थितीचा विचार करून जागतिक बँकेने 2022 मध्ये किशनगंगा आणि रतले पवनऊर्जा संयंत्र संबंधित एक तटस्थ तज्ज्ञ आणि मध्यस्थ न्यायालयाच्या अध्यक्षांची नियुक्ती केली होती.
नऊ वर्षांच्या चर्चेनंतर सही करण्यात आलेल्या या कराराच्या माध्यमातून नद्यांच्या पाण्याच्या वापरासंबंधी सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण होण्यासाठी एक मकेनिजमची स्थापना होते. पण पाकिस्तानकडून आरोप केला जात होता की किशनगंगा रतले हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचे तांत्रिक डिझाईन वैशिष्ट्ये कराराचे उल्लंघन करते.
साठ वर्षांपूर्वीच्या करारावर आज का होतोय वाद? सिंधू पाणीवाटप करार नेमका काय, वाचा सविस्तर..
पाकिस्तानने जागतिक बँकेकडून दोन्ही हायड्रो प्रोजेक्टचे डिझाईनच्या बाबतीत आक्षेपांवर विचार करण्यासाठी मध्यस्थता न्यायालय स्थापित करण्याची मागणी केली होती. तर भारताने एक तटस्थ विशेषज्ञाची नेमणूक करण्याची मागणी केली होती. सोमवारी तज्ज्ञाने एका अधिकृत निवेदनात स्पष्ट केले की दोन्ही पक्षांच्या युक्तिवादावर अत्यंत सावधपणे विचार आणि विश्लेषण केल्यानंतर मतभेदांच्या गुण दोषांच्या आधारावर निर्णय देण्यासाठी पुढे गेले पाहिजे. तज्ज्ञाच्या या वक्तव्यावरुन भारताची बाजू योग्य असल्याचे स्पष्ट होत आहे.
या निर्णयावर अद्याप पाकिस्तानने प्रतिक्रिया दिलेली नाही. आता पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून काय प्रतिक्रिया येतात. हा निर्णय त्यांना मान्य आहे का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मोठी बातमी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांचा तुरूंगवास