साठ वर्षांपूर्वीच्या करारावर आज का होतोय वाद? सिंधू पाणीवाटप करार नेमका काय, वाचा सविस्तर..

साठ वर्षांपूर्वीच्या करारावर आज का होतोय वाद? सिंधू पाणीवाटप करार नेमका काय, वाचा सविस्तर..

Indus Water Treaty : सिंधू पाणीवाटप करारावरून भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने आले आहेत. या कराराचा (Indus Water Treaty) आढावा घेण्यासाठी आणि यात काही बदल करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तानला एक (Pakistan) नोटीस धाडली होती. नोटिसित या कराराची समीक्षा आणि संशोधन करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले होते. यावर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत या कराराच्या (India Pakistan) तरतुदींचे पालन करेल अशी अपेक्षा आहे असे उत्तर पाकिस्तानने दिले आहे. या घडामोडी घडत असताना सिंधू पाणी वाटप करार नेमका कोणत्या कारणामुळे झाला? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

19 सप्टेंबर 1960 रोजी कराची शहरात भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयुब खान या दोघांनी सिंधू नदीबाबत एक करार केला होता. सिंधू नदी या भागातील एक महत्वाची नदी आहे. ही नदी दक्षिण पश्चिम तिबेटमध्ये मानसरोवर तलावा जवळून उगम पावते. काश्मीर आणि पंजाब मार्गे अरबी समुद्रात जाऊन मिळते. या नदीच्या मुख्य सहायक नद्यांमध्ये झेलम, चिनाब, रावी आणि ब्यास या नद्यांचा समावेश आहे.

भारत तोडणार पाकिस्तानचं पाणी? शेजारी देशाला थेट नोटीसच धाडली; काय घडलं?

नेमका काय आहे वाद?

Indus Divided : India, Pakistan and the river Basin Dispute या पुस्तकात पर्यावरण तज्ज्ञ आणि इतिहासकार डॅनियल हॅन्स सांगतात की 1948 हे वर्ष पाकिस्तानच्या पश्चिम पंजाब प्रांतातील लोकांसाठी कठीण होते. सिंचनासाठी कालव्यांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. तरीदेखील पाणी मिळत नव्हते. त्यामुळे कालव्याचे पाणी आम्हाला कधी मिळेल असे या लोकांकडून सातत्याने विचारले जात होते.

या कालव्यात पाणी सोडण्याची परवानगी देणारे अभियंते मात्र पूर्व पंजाबमध्ये होते. यामुळे पाकिस्तानच्या पाणी पुरवठ्यावर भारताला नियंत्रण मिळाले. भारताच्या क्षेत्रात येणाऱ्या सर्व नद्यांवर भारतीय नेत्यांनी हक्क सांगितला. त्यांचे असेही म्हणणे होते की भारताचे इंजिनियर सतलज नदीच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यास सक्षम होते. सतलज नदीमुळे पंजाबमधील (Punjab) कालव्यांना पाणी मिळत होते. पुढे पाकिस्तानने सतलज नदीच्या पाण्यावर आपला हक्क सांगितला. पाकिस्तानातील सिंचन योजनांसाठी हा दावा महत्त्वाचा होता.

हळूहळू हा वाद वाढत गेला. यामध्ये सिंधू, झेलम, चिनाब, रावी, ब्यास आणि सतलज नद्यांचाही समावेश झाला. 1947 मध्ये भारताची फाळणी झाल्यानंतर नवी आंतरराष्ट्रीय सीमा तयार करण्यात आली. दक्षिणी डेल्टातून अधिकांश नद्यांचे पाणी येते. पण याच नद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचे कारण ठरल्या. इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटच्या (World Bank) प्रयत्नानंतर 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू पाणी करारावर सह्या करण्यात आल्या. या करारानुसार भारताला सतलज, ब्यास आणि रावी या नद्यांवर अधिकार मिळाला. पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांच्या पाण्यावर अधिकार मिळाला.

Pakistan : पाकिस्तान सरकारला धक्का! जुन्या मित्राने नाकारली मोठी ऑफर?

युद्धानंतर सुद्धा कराराचे पालन

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाणी वाटपावरून वाद होऊ नये यासाठी हा करार करण्यात आला होता. १९६५ आणि १९७१ मध्ये दोन्ही देशांत युद्ध झाल्यानंतरही (India Pakistan War) दोन्ही देशांनी या कराराचे पालन केले. भारताच्या किशनगंगा आणि रतले प्रकल्पावर पाकिस्तान वेळोवेळी आक्षेप घेत आला आहे. त्यामुळे दोन्ही देशांत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताचे हे दोन्ही प्रकल्प सिंधू जल कराराचे उल्लंघन करतात असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube