New Delhi News : देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) टरबूज घेऊन जाणाऱ्या काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. फक्त टरबुजामुळं त्यांना अटक केलेली नाही तर टरबुजांच्या आत कोट्यावधी रुपयांच्या वस्तू लपवून घेऊन चालले म्हणून अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सने व्यसनमुक्त भारत अभियानांतर्गत ही कारवाई केली आहे.
पथकाने एक आंतरराज्यीय गांजा तस्करी टोळीचा पर्दाफाश केला. पथकाने या टोळीकडून तब्बल 348.176 किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची बाजारातील किंमत अंदाजे 1.75 कोटी रुपये इतकी आहे. डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलीस अपूर्वा गुप्ता यांनी सांगितले की हा गांजा आंध्र प्रदेशातून दिल्लीला आणला जात होता. टरबूजांच्या ट्रकमध्ये लपवून हा गांजा लपवून ठेवला होता.
अयोध्येचं राम मंदिर 45 किलो सोन्याने चमकतंय! किती खर्च आला? घ्या जाणून
20 मे 2025 रोजी पथकाला एक ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गांजा दिल्लीतील सोनिया विहार येथून जाणार आहे अशी माहिती मिळाली होती. यानंतर एक टीम तयार करण्यात आली. 21 मे रोजी रात्री 2 वाजता सोनिया विहार भागात ट्रक रोखण्यात आली. नंतर ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यावेळी टरबुजांच्या खाली गांजाचे 17 प्लास्टिक बॅग मिळून आल्या. प्रत्येक पिशवीत हिरवी पाला असेलला पदार्थ होता.
हाच गांजा असावा असा संशय पोलिसांना आला. त्यानंतर तपासणी करण्यासाठी एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तपासणीनंतर हा गांजाच असल्याचे सिद्ध झालं. या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांत इंतजार मलिक हा गाझियाबाद येथील लोनी येथील रहिवासी आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून तो गांजा तस्करीत आहे. याआधी मलिकला एडीपीएस अॅक्ट अंतर्गत अटक करण्यात आली होती.
अटकेतील दुसरा व्यक्ती रिजवान हा देखील लोनीचाच रहिवासी आहे. रिजवान ट्रकचालक म्हणून या गुन्ह्यात सहभागी होता. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता पोलिसांकडून या सगळ्याच गांजा नेटवर्कचा तपास सुरू झाला आहे. या माध्यमातून गांजाचे स्त्रोत, पुरवठा साखळी आणि यात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींची समोर आणली जाणार आहेत.
Chenab Bridge : पाकसाठी फास अन् चीनलाही टेन्शन; चिनाब पुलामागे आहे मोदींचं खासं ‘चक्रव्यूह’