Download App

लोकसभेनंतर राज्यसभेतही कारवाई! महाराष्ट्रातील वंदना चव्हाण, रजनी पाटलांसह 45 खासदार निलंबित

Rajyasabha MP Suspend : लोकसभेत (Lok Sabha)विरोधी पक्षातील खासदारांवर निलंबनाची कारवाई (MP Suspended)केल्यानंतर आता राज्यसभेतील विरोधी खासदारांचंही निलंबन करण्यात आलं आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या(opposition party) 45 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मराठा समाजाला सरसकट OBC आरक्षण मिळणार? शिंदे समितीचा अंतिम अहवाल शासनाला सादर

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 45 खासदारांपैकी 34 खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी तर विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत 11 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय लोकसभेतील 33 अशा 78 खासदारांना एकाच दिवसात निलंबित केलं आहे.

संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल राज्यसभेने सोमवारी महाराष्ट्रातील वंदना चव्हाण, रजनी पाटील, काँग्रेस खासदार जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह 45 विरोधी सदस्यांना सभागृहातून निलंबित केले. संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी विरोध सुरु ठेवल्यानं राज्यसभेचं कामकाज सोमवारी तीन वेळा तहकूब करण्यात आलं.

सभागृहात गोंधळ घातल्याने संसदेच्या 34 विरोधी खासदार हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले आहेत. लोकसभेतील खासदारांचं निलंबन केल्यानंतर आता राज्यसभेतील खासदार निलंबित केले आहेत. राज्यसभेतील विरोधी पक्षाचे अनेक खासदार गोंधळ घालत असल्याचे सांगत राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

चार लाख मराठे होणार ‘OBC’ : न्या. संदीप शिंदे समितीचा अंतिम अहवाल शासनाला सादर

लोकसभेत सलग चौथ्या दिवशी सुरक्षेच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्याचा पाहायला मिळाला. सभापती ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या 33 खासदारांना निलंबित केलं आहे. त्यात अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे 11 खासदार, तृणमूल काँग्रेसचे 9, द्रमुकचे 9 त्यासह इतर पक्षांतील 4 खासदारांचा समावेश आहे.

लोकसभेतील गदारोळानंतर काही वेळातच राज्यसभेतही गदारोळ पाहायला मिळाला. त्या पार्श्वभूमीवर सभापती जगदीप धनखड यांनी 45 विरोधी खासदारांना अधिवेशनासाठी 22 डिसेंबरपर्यंत निलंबित केलं आहे.

Tags

follow us