New Parliament Building Leak : भारतीय संसदेच्या इमारतीचं काही महिन्यांपूर्वी बांधकाम झालं आहे. त्या इमारतीला एक वर्षही आणखी पूर्ण झालं नाही. इतक्यात इमारतीला गळती लागली आहे. (Parliament) दिल्लीत होत असलेल्या पावसाने या नव्या इमारतीमध्ये पाणी टीपकत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तसंच, प्रवेशद्वारामध्येही पाणी साचल्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरलं झाला होता. त्यामुळे आता विरोधी पक्षाच्या नेत्यांसह देशभरातील नागरिकही यावर उलट-सुलट प्रतिक्रिया देत आहेत.
राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणांची देशभरात चर्चा; वाचा, कुणाचा आहे पडद्यामागील आवाज
मोठ्या थाटामाटात नव्या संसदेचं उद्घाटन झाल. पण, याच नव्या संसदेच्या इमारतीला गळती लागल्याच समोर आल आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. मणिकम टागोर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘संसदेच्या बाहेर पेपर लीक होत आहेत आणि संसदेमध्ये पाणी लीक होत आहे. राष्ट्रपती वापरत असलेल्या संसदेच्या लॉबीमध्ये पाणी गळती होत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले आहेत.
संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; जाणून घ्या, कसा राहणार GDP अन् महागाईचा दर?
भारताच्या संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन २८ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. जुन्या संसदेचे उद्घाटन १८ जानेवारी १९२७ साली करण्यात आलं होतं. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज याच जुन्या इमारतीमध्ये सुरु होते. पण, पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी नव्या इमारत बांधणीचा प्रकल्प हाती घेतला होता.
मोठ्या थाटामाटात नव्या संसदेच्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. मात्र, याच नव्या संसदेच्या इमारतीला गळती लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.#ModiSarkar3 #NewParliamentBuilding #DelhiRains pic.twitter.com/BvIJhFECJj
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 1, 2024