Parliament Session : ओम बिर्लांकडून आणीबाणीची आठवण, विरोधकांचा गोंधळ
Om Birla On Emergency : ओम बिर्ला (Om Birla) यांची आज आवाजी मतदानाद्वारे लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) बिर्ला यांना सन्मानपूर्वक अध्यक्षपदाच्या आसनावर विराजमान केलं. त्यानंतर सदनात भाषण करतांना बिर्ला यांनी आक्रमक भूमिका घेतली. 1975 मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवरून (Emergency) त्यांनी विरोधकांना सुनवाले. तसेच आणीबाणी हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याची टीकाही त्यांनी केली.
जनतेने नतद्रष्ट सरकारच्या छातीतली हवा काढली; वडेट्टीवारांचा राज्यासह केंद्र सरकारवर घणाघात
सदनात बोलतांना बिर्ला म्हणाले की, हे सभागृह 1975 मध्ये आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध करते. ज्यांनी या आणीबाणीला विरोध केला, त्याविरोधात लढा दिला आणि लोकशाहीचे रक्षण केले, त्या सर्वांच्या दृढ संकल्पाचं आम्ही कौतुक करतो. बिर्ला यांच भाषण सुरू असतांना सदनात विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधकांनी घोषणाबाजीही केली. मात्र, ओम बिर्ला यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.
Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेच्या ब्लॅक ड्रेसमधला बोल्ड अंदाज
पुढं बोलताना ते म्हणाले, 25 जून 1975 चा दिवसाला भारताच्या इतिहासातील काळा अध्याय म्हणून ओळखला जाईल. या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या राज्यघटनेवर हल्ला केला. भारताने नेहमीच लोकशाही मुल्यांची सुरक्षा आणि त्याला प्रोत्साहीत केलं. अशा भारतावर इंदिरा गांधी यांच्याद्वारे हुकूमशाही लादली गेली होती. भारतीय लोकशाही मुल्यांची अवहेलन करण्यात आली, अभिव्यक्ती स्वतंत्र्याच्या अधिकाराचा गळा घोटण्यात आला, असं बिर्ला म्हणाले.
नसबंदीचाही केला उल्लेख….
काँग्रेसवर टीका करताना बिर्ला म्हणाले, आणीबाणीच्या कालखंडात काँग्रेस सरकारकडून लोकांवर जबरदस्तीने नसबंदी थोपवण्यात आली. शहरांमधील अतिक्रमणे हटविण्याच्या नावाखाली सरकारच्या मनमानी आणि डावपेचांचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. हे सभागृह त्या सर्वांप्रती शोक व्यक्त करते. 1975 ते 1977 हा काळ आपल्याला राज्यघटनेची तत्वे, संघराज्य संरचना आणि न्यायिक स्वातंत्र्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. या सर्वांवर त्या काळात कसा हल्ला झाला आणि त्याचे संरक्षण का आवश्यक आहे, याची आठवण हा काळ करून देतो, असं बिर्ला म्हणाले.