New Delhi : केंद्र सरकारने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. यामध्ये भारतीयांच्या (New Delhi) खाण्यापिण्याच्या सवयींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात पोषणसंबंधीच्या सेवन नावाच्या या रिपोर्टनुसार सन 2023-24 मध्ये भारतीयांच्या थाळीत कॅलरीच्या प्रमाणात घट झाली आहे. ही घट शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत दिसून आली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला आपल्या भोजनातून मिळणारी ऊर्जा थोडी कमी झाली आहे.
रिपोर्टमधील माहितीनुसार ग्रामीण भारतात सरासरी दैनिक कॅलरीचा वापर कमी झाला आहे. ग्रामीण भागात सन 2022-23 मध्ये प्रति उपभोक्ता सरासरी कॅलरीचे सेवन 2407 कॅलरी इतका होता. 2023-24 मध्ये हा आकडा कमी होऊन 2383 कॅलरी झाला आहे. अशाच प्रकारे शहरी भागात हा आकडा 2488 कॅलरीवरून कमी होऊन 2472 कॅलरी झाला आहे. देशातील अनेक राज्यांत ही घट दिसून आली आहे. रिपोर्टनुसार 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ग्रामीण भाग आणि 12 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील शहरी भागातील लोकांनी मागील वर्षाच्या तुलनेत कमी प्रमाणात कॅलरीचे सेवन केले आहे.
हृदय कमकुवत झालंय? चेहऱ्यावर दिसतात ही ‘चार’ लक्षणे, दुर्लक्ष केल्यास पडेल महागात
या रिपोर्टमध्ये राज्यांची माहिती देण्यात आली आहे. कोणत्या राज्यांतील लोक सर्वात कमी कॅलरीचे सेवन करतात याची माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे. शहरी भागात उत्तर प्रदेश सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. या राज्यात सन 2023-24 दरम्यान सरासरी कॅलरी सेवन 2303 कॅलरी होते. ग्रामीण भागात मेघालय राज्यांत हा आकडा सर्वात कमी होता. या राज्यांत लोकांनी सरासरी 2087 कॅलरीचे सेवन केले.
कॅलरी प्रमाणेच शरीरासाठी प्रोटीन या पोषक तत्वाची खूप गरज असते. प्रोटीनच्या बाबतीत स्थिती स्थिर असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात प्रोटीनचा वापर थोडा कमी झाला आहे. 2022-23 मध्ये प्रोटीनचे प्रमाण 66.7 होते. ते 2023-24 या वर्षात 66.6 ग्राम झाली आहे. शहरी भागांत कोणताही बदल झालेला नाही. प्रोटीन साठी भारतीय लोक अजूनही धान्य, तांदळावर अवलंबून आहे.
रिपोर्ट नुसार ग्रामीण भागात जवळपास 45.9 टक्के प्रोटीन धान्यापासून मिळते. शहरी भागात हा आकडा 38.7 टक्के इतका आहे. धान्यानंतर अंडी, मासे, मांस यांचा नंबर आहे. हे खाद्य पदार्थ ग्रामीण भागात 12.4 टक्के आणि शहरी भागात 14.1 टक्के प्रोटीनची गरज पूर्ण करतात. सध्याच्या परिस्थितीत बदललेल्या लाइफस्टाइलमुळे अन्नातून पोषक तत्वे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
Youtube च्या नियमांत मोठा बदल, लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी मुलांचं वय निश्चित; पालकांनाही जबाबदारी