Anmol Bishnoi : राज्याचे माजी मंत्री बाब सिद्दीक यांच्या हत्येचा आरोपी आणि कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक करण्यात आली असून काही वेळापूर्वीच त्याला भारतात आणले आहे. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, त्याला पटियाला उच्च न्यायालयात नेण्यात आले आहे. एनआयएने अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर अटक केली आहे.
अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) 2022 पासून फरार होता. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमध्ये तो सहभागी होता. तसेच 2020-2023 या कालावधीत देशात विविध दहशतवादी कारवाया करण्यात त्याने गोल्डी ब्रार गँग आणि लॉरेन्स बिश्नोई यांना सक्रियपणे मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर एनआयएने मार्च 2023 मध्ये अनमोलविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
National Investigation Agency (NIA) arrests the brother and close aide of dreaded gangster Lawrence Bishnoi, Anmol Bishnoi, on his deportation from the US to India.
(Source: NIA) pic.twitter.com/kyhlkrgu0a
— ANI (@ANI) November 19, 2025
कोण आहे अनमोल बिश्नोई ?
अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) धाकटा भाऊ अनमोल बिश्नोईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकीच्या हत्येचा आरोप आहे. तसेच बॉलिवूड स्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप देखील अनमोल बिश्नोईवर आहे. याच बरोबर त्याच्यावर देशातील अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहे.
झेडपी अन् पालिका निवडणुकांचं नोटिफिकेशन लांबणीवर; सुप्रीम कोर्टातील सुनावणी नेमकं काय घडलं?
अनमोल बिश्नोईवर यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर हल्ला, प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा कट रचणे आणि मुंबईतील प्रख्यात राजकारणी बाबा सिद्दीकीच्या हत्येचा कट रचणे यासह अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.
