Download App

अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी 35 वेळा पॉलिसी, 26 वेळा भारत अन् 42 वेळा उच्चारलं मोदी

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी आज (दि.1) लोकसभेत अंतरिम बजेट सादर केले. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नाही. याशिवाय प्राप्तिकर परताव्यातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर भरणाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. आज सादर झालेल्या 58 मिनिटांच्या बजेटदरम्यान सीतारामन यांनी भारत, पॉलिसी, PM यासह अनेक शब्द पुन्हा पुन्हा उच्चारले यात टॅक्स आणि PM हे दोन शब्द एक दोनदा नव्हे तर, तब्बल 42 वेळा उच्चारण्यात आले. (Nirmala Sitaraman Budget 2024 Highlights)

Budget 2024 : महिला अन् गरीबांना ‘अच्छे दिन’, मध्यमवर्गीयांना झटका; मोदींच्या बजेटमध्ये कुणाला काय?

सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी कोणत्याही मोठ्या घोषणा केलेल्या नसल्या तरी, त्यांनी गेल्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या कामाचा लेखाजोखा वाचून दाखवला. सरकारचे लक्ष 2047 पर्यंत देशाला विकसित करण्यावर असल्याचे सांगत येत्या जुलै महिन्यात संपूर्ण बजेट सादर केले जाईल असे संकेत सीतारामन यांनी दिले आहे. त्यामुळे करसवलतीसाठी आता नोकरदार वर्गासह सर्वांनाच जुलै 2024 पर्यंत वाट बघावी लागणार आहे.

Budget 2024 : मध्ये महिलांसाठी मोठी घोषणा! 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार

जुलै 2024 पर्यंत बघावी लागणार वाट

आगामी लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे सरकार परत येण्याचा विश्वास व्यक्त करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, जुलैमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होईल तेव्हा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. यात 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट कसे साध्य करायचे याचा तपशीलवार रोडमॅप जनतेसमोर सादर करेल असे सीतारामन यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकांनंतर देशात पुन्हा मोदी सरकार सत्तेत आल्यास येत्या जुलैमध्ये सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात कर सवलतीबाबत काही घोषणा केल्या जाऊ शकता अशी शक्यता आहे.

Budget 2024 : प्राप्तिकर मर्यादा जैसे थे! लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही सर्वसामान्यांची निराशाच

जुलैच्या बजेटमध्ये विकसित भारताचा रोड मॅप दिसेल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, मोदी सरकार देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असून, 2014 पूर्वीच्या सर्व आव्हानांवर आर्थिक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मात करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. यामुळे देश विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असून, हे केवळ योग्य धोरणे, योग्य निर्णय आणि चांगला हेतू यामुळेच शक्य झाले आहे. येत्या जुलैमध्ये सादर करण्यात येणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात मोदी सरकार ‘विकसित भारत’च्या उद्दिष्टासाठी विस्तृत रोडमॅप सादर करेल असेही यावेळी सीतारामन यांनी स्पष्ट केले.

Budget 2024 : आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी; पंतप्रधानांच्या देशवासीयांना शुभेच्छा!

टॅक्स, पंतप्रधान आणि धोरण शब्दांवर भाषणात भर

आज लोकसभेत सादर करण्यात आलेल्या बजेट बारकाईने बघितल्यास सीतारामन यांचे भाषण हे कर, धोरण, पंतप्रधान, सरकार आणि भारत या शब्दांवर केंद्रित होते. निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या बजेटमध्ये 42 वेळा टॅक्स हा शब्द उच्चारला तर, PM हा शब्द 42 वेळा वापरला. याशिवाय भाषणात त्यांनी पॉलिसी हा शब्द 35 वेळा उच्चारला. तर, सरकार हा शब्द 26 वेळा तर, भारत हा शब्द 24 वेळा वापरला गेला. याशिवाय स्त्री हा शब्द 19 वेळा तर, योजना हा शब्द भाषणावेळी 16 वेळा नमूद करण्यात आला. शेतकरी, वित्त, ग्लोबल हे शब्द सीतारामन यांच्या भाषणात 15 वेळा उच्चारण्यात आला.

follow us