Nirmala Sitharaman On Rahul Gandhi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 23 जुलै रोजी 2024-25 साठी अर्थसंकल्प संसदेत सादर केले आहे. या अर्थसंकल्पावर सध्या संसदेत चर्चा सुरु आहे. सोमवार 29 जुलै रोजी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या चर्चेत भाग घेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आपल्या भाषणात बोलताना राहुल गांधी यांनी हा बजेट ‘हवाला बजेट’ असून बजेट बनवणाऱ्यांमध्ये एकही दलित अधिकारी नसल्याचा दावा देखील यावेळी राहुल गांधी यांनी केला होता. तर आज (30 जुलै) अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी यांना उत्तर देत गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांची जात आणि हवाला सेरेमनीमध्ये उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांची जात विचारणे म्हणजे अनेक वर्गात मतभेद निर्माण करण्याचे षड्यंत्र आहे. तसेच राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये किती एससी-एसटी लोकांना ठेवण्यात आले आहे, असा सवाल देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी यांना विचारला.
तर आरक्षणाच्या मुद्यावरून देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या भाषणात बोलताना निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत पंडित नेहरूंचे अनुसूचित जातीच्या संदर्भातील कोट वाचला. यामध्ये त्यांनी आरक्षणाला विरोध करण्याबाबत बोलले आहे. मंडल आयोगाचा अहवाल इंदिरा गांधींच्या सरकारच्या काळात आला आणि तो बाजूला ठेवण्यात आला, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तसेच ही तीच काँग्रेस आहे ज्याचा नारा होता ‘जात पर न पात पर मुहर लगेगी हाथ पर’ आणि हेच फोटो दाखवून ओबीसी, एससी, एसटी बद्दल विचारात आहे. असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.
राजीव गांधी फाउंडेशनमध्ये किती एससी/एसटी ?
तर राजीव गांधी फाउंडेशनमध्ये किती एससी/एसटी ? आहे हे मला जाणून घ्यायचे आहे, असे देखील यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितले. राजीव गांधी फाउंडेशनमध्ये नऊ लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये एकही अनुसूचित जातीचा नाही तसेच राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात 5 लोक आहेत आणि त्यातही एकही अनुसूचित जातीचा नाही. असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.
उद्या मनिका बत्रा, पीव्ही सिंधू गाजवणार मैदान, एका क्लीकवर जाणून घ्या भारताचे वेळापत्रक
अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधी यांनी दावा केला होता क, ज्या 20 अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्प तयार करण्याचा काम केला आहे त्यामध्ये केवळ एक अल्पसंख्याक आहे आणि एक ओबीसी (इतर मागासवर्गीय) आहे. त्यात एकही दलित आणि आदिवासी नाही. असा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला होता.