Gopal Krishna Maharaj : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) उज्जैनमध्ये भजन म्हणत असताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने प्रसिद्ध निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज (Nirupankar Gopalkrishna Maharaj) यांचा निधन झाला आहे. माहितीनुसार, भजन म्हणत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे ते खाली कोसळले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. आज उज्जैनमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 21 जुलै रोजी भागवताचार्य गोपाळकृष्ण महाराज राजगढ येथे त्यांच्या गुरुंच्या समाधीजवळ कथा सांगत होते त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर आज उज्जैनमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भजन म्हणत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र रुग्णालयात जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे.
आज भागवताचार्य गोपाळकृष्ण महाराज यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उज्जैनमध्ये शेकडो भाविकांची गर्दी झाली होती. राजगढ येथे त्यांच्या गुरुंच्या समाधीजवळ कथा सांगत असताना भागवताचार्य गोपाळकृष्ण महाराज यांचा आवाज अचानक बंद झाल्याने लोकांनी त्यांच्याकडे पहिले असता ते चक्कर येऊन खाली कोसळले होते. ज्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र रुग्णलयात डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं.
‘वन्समोअर’ वादावर शिक्षणमंत्र्यांचं अजब स्पष्टीकरण, म्हणाले, मराठीत पर्यायी शब्द नाही
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. आज उज्जैनमध्ये शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरक्षण बचाव यात्रेसाठी आंबेडकरांची जोरदार फिल्डिंग; पवारांसह सत्तेतल्या नेत्याला घातली गळ