Download App

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पावर Nitin Gadkari यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘आमचा अर्थसंकल्प…’

Union Budget 2023-24 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज २०२३-२४ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.

तसेच या अर्थसंकल्पात सर्वाधिक प्राधान्य पायाभूत सुविधांना देण्यात आल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. नितीन गडकरी म्हणाले, निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य दिलं. आमचा अर्थसंकल्प खूप वाढला आहे. यामुळे पुढील काळात देशात जागतिक दर्जाचे रस्ते तयार करण्याचं आमचं उद्दिष्ट राहणार आहे, आणि ते आम्ही पूर्ण करू. ग्रीन एनर्जी, ग्रीन पॉवर अशा ठिकाणाना ‘ग्रीन’ उल्लेख झाला, हे पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल होत.

या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य हे आहे की, सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये हवा- पाणी प्रदुषणाच्या असे गंभीर प्रश्न आहेत. पर्यावरणपुरक धोरणामुळे या प्रदुषणात मोठी सुधारणा होणार आहे. अगोदर मध्यमवर्गाविषयी विचार केला जात नव्हता. यावेळी पहिल्यांदा मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा अर्थसंकल्प गरीबांचं, कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं कल्याण करणारा आहे, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प राहिला. हा अर्थसंकल्प भारताच्या अर्थव्यवस्थेला जगात सुपर इकॉनॉमिक पॉवर करण्याकरिता उपयोगी पडणार आहे. आता स्क्रॅपिंग धोरणामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या विभागात नव्या गाड्या येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं. यामुळे प्रदुषण कमी होईल, असा विश्वास यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

Tags

follow us