पाटना : बिहारमधील नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन आज (दि.19) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते पार पडले. पण चर्चा मोदींच्या भाषणाची नव्हे तर, भर स्टेजवर हजारो उपस्थितांसमोर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी केलेल्या कृतीची झाली. मंचावर मोदी, नितीश कुमार एकत्र बसलेले असताना नितीश यांनी अचानक मोदींचा हात हातात घेत काहीतरी तपासले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर नितीश यांनी मोदींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता त्यांनी थेट मोदींचा हातच धरला आहे. (Nitish Kumar Grab PM Modi Hand In Nalanda University Function Video Goes Viral)
दिल्लीश्वरांनी फडणवीसांसह भाजप नेत्यांना झापलं; हाय व्होल्टेज बैठकीतील ‘अंदर की बात’ बाहेर
नेमकं काय घडलं?
नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (दि.19) बिहारमध्ये आले होते. यावेळी नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी मंचावर एकत्र शेजारी शेजारी बसलेले दिसून आले. मंचावर नालंदा विद्यापीठाचे कुलपती अरविंद पनगरिया विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल माहिती देत होते. ही माहिती मोदी अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. त्यावेळी आपल्या बाजूला बसलेले नितीश कुमार अचान आपला हात धरतील अशी पुसटशी कल्पनाही मोदींनी नव्हती. त्याचवेळी अचानक मोदींच्या बाजूला बसलेल्या नितीश यांनी मोदींचा डावा हात हातात घेत काहीतरी तपासण्यास सुरूवात केली.
नितीश कुमार यांच्या अशा कृतीमुळे मोदीही मिनिटभर आचंबित झाले. नितीश यांना नेमकं काय बघायचं आहे याचा अंदाज मोदींनी घेतला. त्यावेळी नितीश मोदींच्या डाव्या हाताचे पहिले बोट तपासत असल्याचे कळले. हा सर्व प्रकार घडल्यानंतर अगदी काही क्षणात नितीश यांनीदेखील त्यांचे डाव्या हाताचे पहिले बोट मोदींना दाखवले. त्यावेळी मोदी आणि नितीश दोघांनीही एकमेकांकडे बघून स्मित हास्य केले.
Nitish Kumar यांची पहिलीच वेळ नाही; 1974 पासून कधी आरजेडी कधी भाजप तळ्यात-मळ्यात सुरूच
मोदींचा हात धरताच एसपीजी जवान झाले सतर्क
नरेंद्र मोदी कोणत्याही ठिकाणी गेले तरी त्यांच्या आजूबाजूला असलेले सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असते. आजच्या नालंदा विद्यापिठातही तसेच झाले. भर मंचावर अचानक नितीश कुमार यांनी मोदींचा हात धरल्याने मोदींच्या मागच्या बाजूला बसलेले एसपीजी जवानही क्षणात सतर्क झाले.
नितीश कुमार यांनी मोदींच्या हातात काय बघितले?
नालंदा विद्यापिठाच्या कार्यक्रमातील मोदी आणि नितीश कुमार यांचा हातात हात घेतलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, अनेकांना नितीश यांनी मोदींचा हात हातात घेऊन नक्की काय बघितले? असा प्रश्न पडला आहे. याबाबत काही प्रकाशित वृत्तांनुसार नितीश कुमार यांनी पीएम मोदींच्या हातावर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानानंतर लावण्यात आलेली शाई आहे की नाही हे तपासले. तसेच त्यासंबंधी काही प्रश्नही विचारल्याचे सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वी मोदींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न
लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर ज्यावेळी मोदी आणि नितीश कुमार यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्याहीवेळी नितीश यांच्या एका कृतीची जोरदार चर्चा झाली होती. 4 जून रोजी मोदी सरकारच्या शपथविधीपूर्वी जुन्या संसद भवनात एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीत नितीश कुमार यांनी मोदींच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मोदींनी नितीश यांचे हात धरत त्यांना असे करण्यापासून रोखले होते. मात्र, आज नितीश यांनी अचानक मोदींचा हात हातात घेतल्याने बेसावध असणाऱ्या मोदींनाही क्षणभर आश्चर्याचा धक्का बसला.
VIDEO | #Bihar CM Nitish Kumar checks PM Modi's finger for indelible ink mark during the inauguration event of new campus of #NalandaUniversity in Rajgir.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/uBkthqzxMm
— Press Trust of India (@PTI_News) June 19, 2024