Download App

नितीशकुमारांचं पुन्हा वेगळं पॉलिटिक्स, केंद्रात येण्यासाठी भेटीगाठी; बिहारचं राजकारण पुन्हा बदलणार?

Nitish Kumar एकीकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच बिहारच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Nitish Kumar Resign as Bihar CM after Meet with PM Modi : एकीकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच बिहारच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान मोदी ( PM Modi ) आणि त्यानंतर अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ( Nitish Kumar ) आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ( Resign as Bihar CM ) देणार असल्याचे बातम्या समोर येत आहेत. तसेच राजीनाम्यानंतर नितिश कुमार पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात सामील होणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत.

स्ट्राँग रूम म्हणजे काय? कशी होते मत मोजणी, एका क्लीकवर जाणून घ्या सर्वकाही…

दरम्यान असं देखील सांगण्यात येत आहे की, नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाताना बिहारमध्ये भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा करण्याची अट मान्य केली होती. जेणेकरून त्यांच्या नंतर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे बिहारचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अटीनुसारच नितीश कुमार राजीनामा देत आहेत का? त्या बदल्यात त्यांना केंद्रामधील मंत्रिपद मिळणार आहे. अशा सर्व चर्चांना उधाण आलं आहे. या अगोदर देखील नितीशकुमार हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात देखील केंद्रात मंत्री होते. 1998 ते 1999, दुसऱ्यांदा ते 20 मार्च 2001 ते 2004 मध्ये एनडीए सरकारच्या काळात रेल्वे मंत्री होते.

Sanya Malhotra ठरली ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये ‘मिसेस’ साठी गौरव

मात्र अद्याप नितीश कुमार यांच्या या राजीनाम्याबाबत किंवा त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाबाबत भाजप किंवा मधील कोणीही भाष्य केलेलं आहे. मात्र नितीश कुमार यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने त्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात कोण सदस्य असावेत यासाठी भाजपच्या उमेदवारांकडून एक पाच पानांचा फॉर्म भरून घेतला. त्याच वेळी नितीश कुमार देखील दिल्लीत गेल्याने चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.

follow us

वेब स्टोरीज