पाटणा : लोकसभेच्या (Loksabha) पुढील वर्षीच्या निवडणुकीची भाजपसह अन्य पक्षांनीही तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) आतापासूनच चर्चेचा विषय ठरत असून तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अशातच देशातील आगामी लोकसभा निवडणुकांविषयी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Bihar Chief Minister Nitish Kumar) यांनी मोठे विधान केले आहे. ‘भारत जोडो यात्रे (India Jodo Yatras) नंतर आता देशात भाजपच्या विरोधात कमालीचा असंतोष निर्माण झाला. त्यामुळे विरोधी पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवून त्यांचा मुकाबला केला तर भाजप शंभर पेक्षाही कमी जागांवर राहील, असं विधान नितीशकुमार यांनी केले आहे.
पाटण्यात आयोजित केलेल्या एका परिसंवादात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, माझी आता व्यक्तीगत कोणतीही राजकीय इच्छा राहिलेली नाही. आम्हाला केवळ बदल हवा आहे. त्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा मुकाबला केला पाहिजे. मी या एकत्रिकरणाची वाट पहात आहे. त्यात आता उशिर होता कामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
आपण पंतप्रधानपदाचे दावेदार नाही किंवा आपण त्यासाठी उमेदवारही नाही. निवडणूका झाल्यानंतर सगळे पक्ष एकत्र येऊन पंतप्रधान ठरवतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, विरोधकांना एकजूट करण्यात आला उशीर होता कामा नये, कारण, विरोधी पक्षांची एकत्र निवडणूक लढणं हाच निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला असल्याचं नीतीश यांनी सूचित केलं आहे.
नितीश कुमार यावेळी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांना उद्देशून म्हणाले की, मी दिल्लीत जाऊन सोनिया व राहुल गांधींची भेट घेतली. त्यानंतर आता तुमच्या माध्यमातून काँग्रेस नेतृत्वाला आवाहन विरोधकांची एकजूट करण्याचे आवाहन करत आहे. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आमचे स्वागत केले. 2024 मध्ये सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तर भाजपचा सफाया होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुण्यात ठाकरे आणि शिंदे गटात तुफान राडा; कार्यकर्ते आमने- सामने; परिसरात तणावाचे वातावरण
दरम्यान, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी नितीश कुमार यांच्या विधानावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. खुर्शीद म्हणाले की, देशातील सर्व विरोधी पक्षांची लवकरात लवकर एकजूट झाली पाहिजे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तुम्हाला जे हवे आहे तेच काँग्रेस पक्षालाही हवे आहे. पण कधी कधी प्रेमातही अडचण येते. आय लव्ह यू पहिला कोण म्हणणार, असा सवालही त्यांनी केला.