Download App

अंबानी, अदानी ते टाटा… बाजारातील पडझडीतून कोणीही वाचले नाही; जाणून घ्या कुणाचं किती नुकसान झालं?

Stock market crash तून अंबानी, अदानी ते टाटा... कोणीही वाचले नाही; जाणून घ्या कुणाचं किती नुकसान झालं?

No one spared from Stock market crash how much loss each suffered : भारतीय शेअर बाजारासह आज संपूर्ण जगातील शेअर बाजारात मोठी (Stock Market Crash) घसरण दिसून आली आहे. आज भारतीय बाजारात सेन्सेक्स 2,226 अंकांनी घसरून बंद झाला तर निफ्टी 22,200 च्या खाली आला. या घसरणीमुळे भारतीय बाजारात आज 13.5 लाख कोटी रुपये बुडाले आहे. यामध्ये अंबानी, अदानी ते टाटा… कोणाच्याही कंपन्या तरल्या नाही. त्यामध्ये कुणाचं किती नुकसान झालं? जाणून घेऊ सविस्तर…

Deenanath Mangeshkar Hospital : आमचे ग्रह फिरले म्हणून, ‘त्या’ दिवशी डिपॉझिटचा उल्लेख; डॉक्टरांनी काय सांगितलं?

यामध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्समध्ये गेल्या 52 आठवड्यातील सर्वांत मोठी घसरण झाली. शुक्रवारी ते 1204.70 ला बंद झाले होते. तर आज सोमवारी 7 एप्रिलला 79.7 ने घसरण होऊन 1125 उघडला पण त्यात देखील घसरण होऊन 7 टक्क्यांहून अधिक घसरत 1115.55 वर आले. मात्र दुपारनंतर ही परिस्थिती सुधारल्याने 1148.25 रूपयांवर स्थिरावले.

अदानी ग्रुपची काय स्थिती?

ACC Ltd: हा शेअर 3.54% घसरणीसह 1897.60 रुपयांवर वर होता
Adani Enterprises Ltd: हा शेअर 6.60% घसरणीसह 2180.45 रुपयांवर वर होता
Adani Green Energy Ltd: हा शेअर 6.41% घसरणीसह 864.85 रुपयांवर वर होता
Adani Ports: हा शेअर 4.84% घसरणीसह 1093 रुपयांवर वर होता
Adani Power Ltd: हा शेअर 7.77% घसरणीसह 491.10 रुपयांवर वर होता
Ambuja Cements Ltd: हा शेअर 1.93% घसरणीसह 518 रुपयांवर वर होता
Adani Total Gas Ltd: हा शेअर 5 % घसरणीसह 561.60 रुपयांवर वर होता
Adani Wilmar Ltd: हा शेअर 1.65% घसरणीसह 61.80 रुपयांवर वर होता
NDTV: हा शेअर 7% घसरणीसह 110.25 रुपयांवर वर होता

टाटा ग्रुपची काय स्थिती?

Tata Steel Ltd: हा शेअर 10 % घसरणीसह 127 रुपयांवर वर होता
Tata Motors Ltd: हा शेअर 8% घसरणीसह 563.80 रुपयांवर वर होता
Tata Consultancy Services: हा शेअर 4 % घसरणीसह 3165.10 रुपयांवर वर होता
Trent Limited: हा शेअर 17 % घसरणीसह 4623.35 रुपयांवर वर होता
Tata Consumer Products: हा शेअर 4 % घसरणीसह 1038.65 रुपयांवर वर होता
Tata Technologies: हा शेअर 7 % घसरणीसह 603.55 रुपयांवर वर होता
Tata Communications: हा शेअर 4 % घसरणीसह 1527.50 रुपयांवर वर होता
Titan Company Ltd: हा शेअर 3 % घसरणीसह 2981.35 रुपयांवर वर होता
Voltas Ltd: हा शेअर 2 % घसरणीसह 1273.30 रुपयांवर वर होता
Tata Elxsi Ltd: हा शेअर 6.29% घसरणीसह 4740.40 रुपयांवर वर होता

follow us