Noida : क्लबच्या पार्टीत रामायणाच्या डबिंग व्हिडिओवर लोकांचं नृत्य…

उत्तर प्रदेशात रामयाणाच्या सीनवर डबिंग गाण्यावर एका क्लबमध्ये लोकांचं नृत्य सुरु असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलमधला असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशात रामयाणाच्या सीनवर डबिंग गाण्यावर एका क्लबमध्ये लोकांचं नृत्य सुरु असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. नोएडा पोलिसांनी क्लबच्या मालकासह व्यवस्थापकाला अटक केली आहे. #Noida लॉर्ड ऑफ ड्रिंक्स क्लब […]

Noida Viral Video

Noida Viral Video

उत्तर प्रदेशात रामयाणाच्या सीनवर डबिंग गाण्यावर एका क्लबमध्ये लोकांचं नृत्य सुरु असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलमधला असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशात रामयाणाच्या सीनवर डबिंग गाण्यावर एका क्लबमध्ये लोकांचं नृत्य सुरु असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. नोएडा पोलिसांनी क्लबच्या मालकासह व्यवस्थापकाला अटक केली आहे.

या व्हिडिओमध्ये श्रीराम आणि रावणाच्या युद्धाचा व्हिडिओ डंबिग करुन चालवला जात असल्याचं दिसतंय. तर क्लबमधील लोकं व्हिडिओवर नाचत असल्याचं दिसतंय. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी क्लबच्या मालकाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ लॉर्ड ऑफ ड्रिंक्स क्लब ऑफ गार्डन गॅलेरिया मॉलचा असून मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्लबमधील डबिंग व्हिडिओ रामानंद सागर यांच्या रामायण सीरियलमधला आहे.

चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या, नाहीतर तुम्ही द्या; ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

व्हिडिओमध्ये राम आणि रावण युद्धाच्या वेळी बोलत असतनाचे चित्र दाखवण्यात आले आहे. तसेच काही बाईट्स जोडून हे गाणे बनवले आहे. लोक या गाण्यावर नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी दखल घेत गुन्हा नोंद केला आहे. यासंरर्भात उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध पोलिस आयुक्तालयाने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

गॅलेरिया मॉल याआधीही एकदा चर्चेत आले होते. पार्टीसाठी आलेल्या लोकांमध्ये वाद होऊन वादात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता याच मॉलचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मॉल पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

Exit mobile version