Download App

मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची मोठी घोषणा, अदानी फाउंडेशनकडून 100 कोटी रुपये घेणार नाही, ‘हे’ आहे कारण

CM Revanth Reddy : गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचे आरोप झाल्याने लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गौतम अदानी

  • Written By: Last Updated:

CM Revanth Reddy : गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचे आरोप झाल्याने लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर जोरदार टीका केली होती तर आता तेलंगणा सरकारने (Telangana Government) मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी गौतम अदानी फाउंडेशनकडून (Adani Foundation) युवकांच्या कौशल्य विकासासाठी दिलेली 100 कोटी रुपयांची देणगी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

गौतम अदानी यांनी तेलंगणामध्ये गुंतवणूक केल्याने विरोधकांकडून रेवंत रेड्डी सरकारवर टीका करण्यात येत होती. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि गौतम अदानी यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर भाजपकडुन राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देत तेलंगण प्रोजेक्टचा हवाला देण्यात आला होता. त्यामुळे आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोठा निर्णय घेत 100 कोटी रुपयांची देणगी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, मी हा निर्णय कोणत्याही दबावाशिवाय घेत आहे. माझ्यावर कोणी दबाव आणू शकत नाही आणि कोणी दबाव आणला तर ते मान्य करणार नाही. असं माध्यमांशी बोलताना रेवंत रेड्डी म्हणाले. अदानी ग्रुपवर काही आरोप करण्यात आले आहे आणि त्या आरोपांमध्ये तेलंगणा राज्याचा उल्लेख होता. तेलंगणाला या संपूर्ण वादापासून दूर ठेवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले. तसेच आतापर्यंत 100 कोटी रुपयांचा एक रुपयाही सरकारकडे आला नाही.याबाबत देखील त्यांनी माहिती दिली.

निवडणूक मोठ्या मताधिक्याने कशी जिंकली? जितेंद्र आव्हाडांनी केला मोठा खुलासा

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी पुढे म्हणाले की, आम्ही सरकार चांगल्या पद्धतीने चालवत आहे आणि आम्हाला कोणत्याही वादात पडायचे नाही. त्यामुळे आम्ही सीएसआर म्हणून मिळणारा निधी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेवंत रेड्डी यांच्या सरकारला डिसेंबरमध्ये एक वर्ष पूर्ण होणार आहे.

follow us