NSE IPO 17 सप्टेंबरला येणार ; गुंतवणुकीचा विचार? तर जाणून घ्या सर्वकाही

NSE IPO : भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठ्या आयपीओपैकी एक असणारा नॅशनल स्टॉक एक्सचेंज कंपनीच्या आयपीओची प्रतीक्षा आता संपली आहे.

NSE IPO

NSE IPO

NSE IPO : भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठ्या आयपीओपैकी एक असणारा नॅशनल स्टॉक एक्सचेंज कंपनीच्या आयपीओची प्रतीक्षा आता संपली आहे. भारतीय शेअर बाजारात आयपीओ 17 सप्टेंबर रोजी खुला होणार आहे. या आयपीओसाठी NSE ने ‘प्राइस बँड’ देखील निश्चित केला आहे. 22,569 कोटी रुपयांचे मूल्य असलेला हा इश्यू भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील एक मोठा IPO ठरणार आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आयपीओ 17 सप्टेंबर रोजी खुला होणार असून त्यासाठी बोली प्रक्रिया 21 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. कंपनीने प्रति इक्विटी शेअर 1700 ते 1785 रुपये असा प्राइस बँड निश्चित केला आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया 16 सप्टेंबर रोजी सुरू होईल. NSE चे शेअर्स 24 सप्टेंबर रोजी बाजारात सूचीबद्ध (लिस्ट) होण्याची अपेक्षा आहे.

22,569 कोटी रुपयांचा इश्यू

हा IPO पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) स्वरूपाचा असल्याने विद्यमान भागधारक (Shareholders) त्यांचे सुमारे 12.64 कोटी इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करुन देणार आहे. प्राइस बँडच्या वरच्या मर्यादेनुसार या इश्यूचा आकार सुमारे 22,569 कोटी रुपये असेल, तर खालच्या मर्यादेनुसार तो सुमारे 21,494 कोटी रुपये असेल. हा ‘ऑफर फॉर सेल’ असल्याने, आयपीओ मधून मिळणारी रक्कम NSE कडे न जाता शेअर्स विकणाऱ्या भागधारकांकडे जाईल.

मोठी बातमी, मनोज जरांगेंविरोधात ED कडे तक्रार; 1000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप-

ह्युंदाईनंतरचा दुसरा सर्वात मोठा IPO

22,569 कोटी रुपयांचा NSE IPO ह्युंदाईनंतरचा देशातील दुसरा सर्वात मोठा पब्लिक इश्यू ठरणार आहे. सध्या सर्वात मोठ्या IPO चा विक्रम ह्युंदाई मोटर इंडियाच्या 27,870 कोटी रुपयांच्या इश्यूच्या नावावर आहे, जो 2024 मध्ये आला होता. NSE चा IPO 2022 मध्ये आलेल्या 21,000 कोटी रुपयांच्या LIC IPO ला मागे टाकेल.

Exit mobile version