Download App

दिल्लीत ऑड-इव्हन नियम लागू, शाळांनाही सुट्टी, प्रदूषण रोखण्यासाठी केजरीवाल सरकारचे मोठे निर्णय

  • Written By: Last Updated:

Delhi air pollution : जगातील सर्वाधिक प्रदूषित हवा असलेल्या शहरांमध्ये दिल्ली अव्वलस्थानी आहे. कालपासून धूर-धुळीमुळं दिल्लींच आकाश पूर्णपणे झाकोळलं आहे. आणखी दोन आठवडे तरी हीच परिस्थिती कायम राहील, असं बोलल्या जातं आहे. दरम्यान, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवा (Arvind Kejriwal) यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली.

विजयसिंह मोहिते पाटलांना मोठा धक्का, तीस वर्षीची सत्ता राष्ट्रवादीने उलथवली 

या बैठकीत केजरीवाल सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. केजरीवाल सरकारने दिवाळीनंतर एक आठवडा सम-विषम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत सम-विषम लागू करण्याची घोषणा केली आहे.

केजरीवाल सरकारने माध्यमिकपर्यंतच्या सर्व शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र ज्यांचे दहावी आणि बारावीचे बोर्डाचे पेपर आहेत त्यांच्यासाठी शाळा खुल्या राहतील. या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार? याबाबत उद्या बैठक होणार आहे. मात्र नववीपर्यंतच्या शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आल्या होत्या. पाचवी ते ऩववीतील विद्यार्थ्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने शिकवावे, अशा सुचना दिल्यात.

याशिवाय, दिल्लीत बीएस-3 पेट्रोल आणि बीएस-4 डिझेल कारवर बंदी घातली आहे. महत्वाचं म्हणजे, राज्यातील सर्व भागात फटाक्यांची खरेदी-विक्री रोखण्यासाठी दिल्ली सरकारने 210 पोलिस पथके तयार केली आहेत.

दिल्लीत अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.

दिल्ली सचिवालयात झालेल्या या बैठकीत पर्यावरण मंत्री गोपाल राय, मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत आणि सर्व संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.

दरम्यान, दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, दिल्लीत 30 ऑक्टोबरपासून प्रदूषणात वाढ होत आहे. शास्त्रज्ञांच्या विश्लेषणानुसार वाऱ्याचा वेग खूपच कमी नोंदवला जात आहे. मात्र, दिल्लीतील सरकारी आणि खाजगी कार्यालयातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या आदेशावर नंतर निर्णय घेतला जाईल.

ऑड-ईवन म्हणजे काय?

ऑड-इव्हननुसार, ज्या गाड्यांचे क्रमांक 1, 3, 5, 7 आणि 9 अंकांनी संपतात, त्या एक दिवशी धावतात, तर 0, 2, 4, 6 आणि 8 क्रमांक असलेल्या गाड्या दुसऱ्या दिवशी धावतात. हा नियम पेट्रोल आणि डिझेल वाहनांना लागू आहे. सीएनजी वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. 1, 3, 5, 7 आणि 9 क्रमांकाच्या गाड्या 13, 15, 17 आणि 19 नोव्हेंबर रोजी दिल्लीत धावू शकतील. तर 14, 16, 18 आणि 20 नोव्हेंबर रोजी 0, 2, 4, 6 आणि 8 क्रमांकाच्या गाड्या धावू शकतील.

आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे की प्रदूषणाबाबत फक्त दिल्ली आणि पंजाब सरकारच पावले उचलत आहेत. हरियाणा याबाबत गंभीर नाही.

 

Tags

follow us