Old Rajender Nagar Incident: दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरच्या (IAS Coaching Centre) तळघरात पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या कोचिंग सेंटरवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आता या कोचिंग सेंटरच्या मालकासह अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
Haribhau Bagde : मोदींनी हरिभाऊंना विचारलं, तुम्हाला महाराष्ट्रा बाहेर जायचं आहे का..
सविस्तर वृत्त असे की, शनिवारी संध्याकाळी कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने एक मुलगा आणि दोन मुलींचा मृत्यू झाला. श्रेया यादव, तान्या सोनी आणि नेविन डेल्विन अशी त्यांची नावे आहेत. तिघांच्याही कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.
श्रेया यादव ही विद्यार्थिनी यूपीच्या आंबेडकर नगर येथील रहिवासी होती. तर तान्या ही तेलंगणाची रहिवासी होती. नेविन हा विद्यार्थी केरळचा होता. तो जेएनयूमधून पीएचडीही करत होता. सुमारे आठ महिने तो नागरी सेवेची तयारी करत होता. पोलिसांनी तिघांच्याही कुटुंबीयांना माहिती दिली आहे.
मालकासह दोघांना अटक….
दरम्यान, यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच, भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 106 (1), 152, 290 आणि 35 अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस या दोघांची चौकशी करत आहेत.
या अटकेच्या कारवाईनंतर दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांनी संबंधित इमारतीचे तळघर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दिल्लीत इतर ठिकाणी अशाप्रकारे तळघरांचा वापर अन्य दुसऱ्या कामांसाठी होत असेल तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शैली ओबेरॉय यांनी यासंदर्भात एमसीडी आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. एमसीडीच्य अखत्यारित येणाऱ्या इमारतीच्या तळघरात अनधिकृत सुरू असलेल्या कोंचिग सेंटर्सवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असं त्या म्हणाल्या.