Download App

omar abdullah : ‘दहशतवाद्यांना बाहेर फेकून द्या’ म्हणणाऱ्या रमेश बिधुरींवर अब्दुलांचा संताप; म्हणाले..,

omar abdullah : दहशतवादी बोलले त्याची सवय पण नंतर जे काही बोलले त्याची लाज वाटत असल्याचा संताप नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला(omar abdullah) यांनी व्यक्त केला आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलत असताना भाजप खासदार रमेश बिधुरी( ramesh bidhuri) यांची जीभ घसरली आहे. बिधुरी यांच्या विधानानंतर देशभरातील नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पुढे बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले, ते फक्त दहशतवादी म्हणाले असते तर त्याची आम्हाला सवय झाली आहे. तुम्ही माझं सोशल मीडिया अकाउंट बघा. आम्हाला दहशतवादी बोलताना हे लोक कधीच थकत नाहीत. परंतु, दहशतवादी शब्दाबरोबर ते (बिधुरी) जे काही बोलले, त्यांचे ते शब्द मला इथे बोलून दाखवायचे नाहीत. मला या सगळ्याची लाज वाटते. आपल्या संसदेत अशा प्रकारचे शब्द वापरले गेल्याची मला लाज वाटत असल्याचं ते म्हणाले आहेत.

Radhakrishn Vikhe : संजय राऊत सर्वात मोठा दलाल; मंत्री विखेंची कडव्या शब्दांत टीका

तसेच बिधुरी यांचे शब्द ऐकून मी नाराजही झालो, कारण ते शब्द देशातल्या तमाम मुसलमानांसाठी वापरले गेले आहेत. मला एक गोष्ट कळत नाही की जे मुसलमान भाजपात आहेत किंवा भाजपाशी संबंधित आहेत, ते लोक हे सगळं कसं काय सहन करतात? मी भाजपाबाहेर आहे तरीदेखील हे सहन करणं मला अवघड जातंय. परंतु, जे लोक भाजपाबरोबर मिळून काम करत आहेत त्या लोकांना रात्री झोप कशी येते? आपलेच सहकारी आपल्याबद्दल अशा प्रकारचा विचार करतात हे समजल्यावर त्यांना झोप कशी लागते? असा सवालही अब्दुल्ला यांनी केला आहे.

शिवशक्ती पॉइंटवर हालचालींना वेग; विक्रम लँडर अन् प्रज्ञान रोव्हरसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

काय म्हणाले रमेश बिधुरी?
ए भ** ए उग्रवादी तुला उभा राहून बोलू देणार नाही सांगून ठेवतो. हे मुल्ला उग्रवादी, दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेकून द्या याला असं खासदार दानिश यांना दहशतवादी म्हणत शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपच्या खासदाराने केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मात्र माफी मागितली.

दरम्यान, बिधुरी यांनी वापरलेले हे शब्द तमाम मुस्लीम समाजाबद्दल आहेत. हे सगळं केवळ एका खासदाराबद्दल नाही. यामधून कळतंय की त्यांचे (भाजपा) मुसलमानांबद्दल काय विचार आहेत. ते आमच्याबद्दल नेमका काय विचार करतात ते यातून समजतंय. सरकारला याची लाज वाटली पाहिजे. देशाची संसद नवी आहे परंतु, तिथल्या लोकांचे विचार मात्र तेच जुने आणि घाणेरडे असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us