Radhakrishn Vikhe : संजय राऊत सर्वात मोठा दलाल; मंत्री विखेंची कडव्या शब्दांत टीका

Radhakrishn Vikhe : संजय राऊत सर्वात मोठा दलाल; मंत्री विखेंची कडव्या शब्दांत टीका

Radhakrishn Vikhe : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn Vikhe) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यामध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध पेटले आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसाची फसवणूक करुन राऊतने कोट्यवधींची संपत्ती गोळा केली. कोरोनाच्या काळात एकीकडे लोकांचा जगण्याचा संघर्ष सुरु असताना दुसरीकडे मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यात ज्याने धन्यता मानली तो संजय राऊत हा मोठा दलाल आहे, आहे अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

Dhangar Reservation चा निर्णय होईपर्यंत समाजाला आदीवासींच्या योजना लागू होणार; मुख्यमंत्र्यांचा दिलासा

संगमनेरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांनी विखे पाटील यांच्यावर साखर कारखाना प्रकरणात आरोप केले. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे, त्याने आयुष्यभर दलालीच केली आहे.

मला काही फरक पडत नाही…

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला विखेंनी जोरदार प्रत्युत्तर देताना म्हणाले, राऊतच्या टीकेला कुठे महत्व देता? ज्येष्ठ संपादक माधव गडकरी आज असते, तर त्यांनी संजय राऊत यांचं कर्तृत्त्व कसं आहे, हे सांगितलं असतं. ज्याचे महिलेसंबंधीचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. ते लोक माझ्यावर आरोप करत असतील, तर मला काही फरक पडत नाही असं मंत्री विखे म्हणाले आहे.

व्यक्तिगत, मर्यादाबाह्य टीका अशोभनीय…; पडळकरांच्या वक्तव्यावर बावनकुळे स्पष्टच बोलले…

दरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि चारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिल्या आहेत. संगमनेर तालुक्यात आज टंचाई आढावा बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विखे पाटलांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube