Download App

SEBI: ..मग अध्यक्षांनी राजीनामा का दिला नाही?, राहुल गांधींची सेबी’च्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती

अमेरिकेची शॉर्ट सेलर संस्था हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालावरून राहुल गांधी यांनी ‘सेबी’च्या कारभार गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi on SEBI : हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालावरून रण उठलं आहे. (Hindenburg) ही अमेरिकेची शॉर्ट सेलर संस्था आहे. अशातच आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘सेबी’च्या कारभाराच्या अनुषंगाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी-बुच यांनी अजूनपर्यंत राजीनामा का दिला नाही?, सर्वोच्च न्यायालय स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत चौकशी करणार आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

SEBI Action : अर्शद वारसीसह पत्नी आणि मेहुण्यावर सेबीची कारवाई, अशी करत होते फसवणूक

पंच जेव्हा तडजोड करतात

सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावरील आरोपांमुळे सेबीची अखंडता धोक्यात आली असून गुंतवणूकदारांनी कष्टाचे पैसे गमावले तर जबाबदार कोण?, असा थेट प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला त्यांनी क्रिकेट मॅचच्या अंपायरचा उल्लेख केला. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्याचे पंच जेव्हा तडजोड करतात, तेव्हा त्या सामन्याचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

follow us