नफेखोरीसाठी खोडसाळ अन् निराधार आरोप; हिंडेनबर्गच्या अहवालावर अदानींची पहिली प्रतिक्रिया

नफेखोरीसाठी खोडसाळ अन् निराधार आरोप; हिंडेनबर्गच्या अहवालावर अदानींची पहिली प्रतिक्रिया

Adani Group On Hindenburg New Report : अमेरिकी रिसर्च आणि गुंतवणूक कंपनी हिंडनबर्गने (Hindenburg Research Report) अदानी ग्रुप संदर्भात पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. या कंपनीचा अहवाल समोर (Adani Group) आल्यानंतर भारतातलं राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा सरकारला टार्गेट केलं आहे. आता या प्रकरणात अदामी समुहाची प्रतिक्रिया समोर आली आहे. हिंडनबर्गने केलेले आरोप अदानी समुहाने नाकारले आहेत. नफा कमावण्यासाठीच हा उद्योग सुरू असून हिंडनबर्गचे आरोप खोडसाळ आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

अदानी ग्रुपने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. यात म्हटले आहे की हिंडेनबर्ग कंपनीने केलेले आरोप दुर्भावनापूर्ण आहेत. जे काही तथ्य आहेत वस्तुस्थिती आहे त्यात मोडतोड करण्याचं काम या कंपनीनं केलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व आरोप फेटाळत आहोत. हिंडेनबर्गचे आरोप निराधार आणि आम्हाला बदनाम करण्याच्या उद्देशाने केले आहेत. याआधीही या आरोपांची सखोल तपास झाला आहे. त्यात हे सगळे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमचं ओव्हरसीज होल्डिंग स्ट्र्क्चर पूर्णपणे पारदर्शक आहे. यामध्ये सर्व प्रकारची माहिती आणि तपशील अनेक सार्वजनिक कागजपत्रे नियमितपणे प्रसिद्ध केली जातात. आता जाणूनबुजून बदनाम करण्याच्या उद्देशाने या अहवालात ज्या व्यक्तींची नावं घेण्यात आली आहेत त्यांचा अदानी ग्रुपशी कोणताही व्यावासायिक संबंध नाही असे अदानी ग्रुपने या निवेदनात स्पष्ट केले आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालात नेमकं काय?

अदानी समूहाविरोधात खळबळजनक अहवाल सादर करणारी हिंडनबर्ग (Hindenburg) ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाशी संबंधित एका प्रकरणात पुन्हा एकदा नवा दावा (Hindenburg New Report) केला. हिंडेनबर्ग रिसर्चने सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच (Madhavi Puri Buch) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात माधवी पुरी बुच यांचा सहभाग असल्याचे हिंडेनबर्ग रिसर्चने नव्या अहवालात केलं.

Hindenburg Research: हिंडेनबर्गच्या आरोपानंतर एक्स अकाउंट केलं लॉक?, ‘सेबी’ नक्की काय लपवतंय?

हिंडेनबर्ग रिसर्चने शनिवारी दावा केला की सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अदानींच्या पैशांचा वापर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑफशोर संस्थांमध्ये भाग घेतला होता. या अहवालात म्हटलं की, पुरावे असूनही त्यांच्या विरुध्द आणि अदानी समूहाविरुद्ध सेबीने कोणतीही सार्वजनिक कारवाई केली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube