Download App

One Nation, One Election चा सरकारच्या तिजोरीवर भार पडणार? आयोगाने दिला हिशोब…

  • Written By: Last Updated:

One Nation, One Election : केंद्रातील मोदी सरकार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation, One Election) विधेयक लागू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार हालचाली सुरू असून आता या हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकारने ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन केली आहे.

खरंतर देशात वर्षभर कुठं ना कुठं निवडणुका होतात. वेगवेगळ्या राज्यात विधानसभेचा कार्यकाळ वेगवेगळा असल्यानं वेगवेगळ्या वेळी निवडणूका घेतल्या जातात. निवडणूक जाहीर होताच त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होते. आचारसंहितेच्या काळात राष्ट्रीय विकास योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येत असल्याचे मोदी सत्तेत आल्यापासून सांगत आहेत. त्यामुळं मोदी सरकार वन नेशन वन इलेक्शन विधेयक आणू पाहताहेत. त्यासाठीच सरकारने हे विशेष अधिवेशन बोलावल्याची सांगण्यात येत आहे.

पैशांची बचत करणं, प्रशाककीय कार्यक्षमतेत सुधारणं करणं आणि संभाव्य मतदानात वाढ कऱणं हे वन नेशन, वन इलेक्शनचे उद्दीष्ट आहे. एकाच वेळी निवडणुका झाल्यास वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकतो, असं सरकार सांगता आहे.

निवडणूक आयोगावर किती खर्च होणार?
वन नेशन, वन इलेक्शन कमिटीच्या स्थापनेपूर्वी पाच महिने आधी, कायदा मंत्रालयाने 2024 आणि 2029 मध्ये एकाचवेळी होणाऱ्या निवडणुकांसाठी EVM-VVPAT आवश्यकतांबाबत भारतीय निवडणूक आयोगाकडून (ECI) तपशील मागवले होते.

मार्च 2023 मध्ये, निवडणूक आयोगाने सांगितले होते की, 2024 किंवा 2029 मध्ये एकाचवेळी होणाऱ्या निवडणुकांसाठी अनुक्रमे 5,100 कोटी रुपये आणि सुमारे 8,000 कोटी किमतीचे EVM आणि VVPAT खरेदी करणे आवश्यक आहे.

2023 च्या अर्थसंकल्पात, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी EVM-VVPAT च्या खरेदीसाठी सुमारे 1,900 कोटींची तरतूद केली होती.

ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) मध्ये दोन युनिट्स असतात – एक कंट्रोल युनिट (CU) जे मतदान केंद्रावर अधिकाऱ्यासोबत असते आणि एक बॅलेटिंग युनिट (BU) जे मतदानाची नोंद करण्यासाठी मतदान केंद्राच्या आत ठेवले जाते. व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) मतदाराने निवडलेल्या उमेदवाराला त्याच्या मताची पडताळणी करेत.

2024 मध्ये एकाच वेळी निवडणुका घेतल्यास 46,75,100 BUs, 33,63,300 CUs आणि 36,62,600 VVPAT ची आवश्यकता असेल असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 2024 च्या एकाचवेळी होणाऱ्या निवडणुकांसाठी 15.97 लाख BUs, 11.49 लाख CUs आणि 12.36 लाख VVPAT चा तुटवडा आहे.

जगातील या देशांमध्ये होते एकाच वेळी निवडणूक
जगातील अनेक देश ‘वन नेशन वन इलेक्शन’ हे सूत्र स्वीकारत आहेत. यामध्ये जर्मनी, हंगेरी, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, स्पेन, स्लोव्हेनिया, अल्बेनिया, पोलंड आणि बेल्जियम यांचा समावेश आहे. अलीकडेच स्वीडनमध्येही एकाचवेळी निवडणुका झाल्या.

Tags

follow us