Download App

काँग्रेसवर डोनेट फॉर देश मोहीम चालविण्याचा वेळ का आली ? काँग्रेस व भाजपकडे नक्की किती पैसा?

  • Written By: Last Updated:

नवी दिल्लीः काँग्रेस (Congress) हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. या पक्षाची केंद्रात, अनेक राज्यात अनेक वर्ष सत्ता राहिली आहे. परंतु गेल्या दहा वर्षांपासून या पक्षाची राजकीयदृष्ट्या पिछेहाट झाली आहे. त्याचबरोबर आता या पक्षाला निधीची चणचण भासू लागली आहे. पक्षाला निधी मिळविण्यासाठी डोनेट फॉर देश हे कॅम्पेन काँग्रेसने सुरू केले आहे. काँग्रेसच्या 138 व्या स्थापना दिवसापासून क्राउड फंडिंग (crowd funding) जमा केला जात आहे.

Manoj Jarange : मुलाच्या नावामागं आईची जात लावायला काय हरकत? अजिदादांचं नाव न घेता जरांगेंचा हल्लाबोल

काँग्रेसची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हे कॅम्पेन सुरू केले असल्याचे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर काँग्रेसला कॉर्पोरेट क्षेत्राकडून पक्ष निधी मिळत नसल्याने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. राजकीय पक्षांकडून येत असलेल्या पक्ष निधीचा विचार केल्यास सत्ताधारी भाजपकडे (Bjp) सध्या सर्वाधिक पैसा आहे. तर काँग्रेसना मिळणाऱ्या निधीत घट झाली आहे. काँग्रेसच्या निधीत तीस टक्के घट झाली आहे. 2014 ते 2022 च्या विचार केल्यास काँग्रेसा मिळणाऱ्या पैशामध्ये 541 कोटी रुपये घट झाली आहे. राजकीय पक्षांचा अभ्यास करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालातून ही माहिती उघडकीस आली आहे.

काँग्रेसला 2014-15 या वर्षात 765 कोटीचा पक्ष निधी मिळाला होता. त्यानंतर मात्र भाजप सत्तेत आल्यानंतर काँग्रेसच्या निधीमध्ये सातत्याने घट झाली. 2017-2018 मध्ये काँग्रेसला फक्त 199 कोटींचा पक्ष निधी मिळाला होता. तर 2019-20 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 998 कोटी रुपये मिळाले होते. तर त्यानंतर काँग्रेसकडे पैशाचा ओघ आटला. 2021-22 मध्ये काँग्रेसला 541 कोटी मदत मिळाली होती.

‘CM शिंदे अन् अजितदादांना भाजपची स्क्रिप्ट वाचावीच लागते’; रोहित पवारांची जळजळीत टीका

सहा वर्षांत भाजपची संपत्ती किती वाढली ?
भाजपला 2014-15 मध्ये 970 कोटी रुपये निधी मिळाला होता. सत्तेत असलेल्या भाजपच्या निधीमध्ये सातत्याने मोठी वाढ होत गेली. 2017-18 मध्ये भाजपला 1027 कोटी रुपये मिळाले होते. तर लोकसभा निवडणुकीच्या 2019-20 च्या काळात भाजपला भरमसाठ पैसे मिळाले होते. भाजपला तब्बल 3 हजार 623 कोटी रुपये मिळाले होते. परंतु त्यानंतर 2021-22 मध्ये भाजपच्या निधीमध्ये घट झाली. त्या वर्षी 1 हजार 917 कोटी रुपये मिळाले होते. गेल्या सहा वर्षाच्या विचार केल्यास भाजपला पक्ष निधी म्हणून दुप्पट पैसा मिळालेला आहे. एडीआरच्या आकडेवारीनुसार भाजपकडे सध्याच्या घडीला सहा हजार कोटींची संपत्ती आहे. तर काँग्रेसकडे 805 कोटींची संपत्ती आहे.

Tags

follow us