‘CM शिंदे अन् अजितदादांना भाजपची स्क्रिप्ट वाचावीच लागते’; रोहित पवारांची जळजळीत टीका

‘CM शिंदे अन् अजितदादांना भाजपची स्क्रिप्ट वाचावीच लागते’; रोहित पवारांची जळजळीत टीका

Rohit Pawar On Ajit Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजपची स्क्रिप्ट वाचावीच लागत असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. दरम्यान, पुण्यातील बारामतीत आयोजित कार्यक्रमातून अजित पवार यांनी शरद पवारांसह गटातील नेत्यांवर खोचक टीका केली आहे. त्यावर बोलताना रोहित पवार यांनीही भाजपचं नाव घेत मुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. पुण्यात आयोजित भीमथडी यात्रेदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Aishwarya Sharma: एक्स बॉयफ्रेंडवर भडकली ऐश्वर्या शर्मा.. म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे तुला..’

रोहित पवार म्हणाले, शरद पवारांनी स्वत:च्या हिमतीवर पक्ष उभा केला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनानेच 38 व्या वर्षी अनेकांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला होता. आज अजित पवार गटातील नेते हे शरद पवार यांच्यामुळेच सत्तेत बसले आहेत. सत्तेत असल्यावर त्यांना असं वाटतयं की, स्वत:मुळेच सत्ता मिळालीयं पण
लोकांमुळे सत्ता येत असते हे त्यांनी विसरु नये, असा खोचक सल्लाही रोहित पवार यांनी दिला आहे.

“दादा खरोखर मोठे नेते, ते माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आव्हान देणार नाहीत” : कोल्हे डिफेन्सिव्ह भूमिकेत

तसेच तुमच्याकडे मोठी ताकद पैसा असेल पण आमच्याकडे लोकं आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप केल्यानंतरच राष्ट्रवादीतील नेते भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्तेत गेले आहेत. त्यांच्याकडे केंद्र सरकार आहे, केंद्रीय संस्था आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अडचणीत आणण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

Horoscope Today: आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता

आम्ही यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये जात असतो. आता लोकांमध्ये जाणं हे योग्य नसले तर तो त्यांचा विषय आहे. पैशांच्या आणि अहंकाराच्या ताकदीमुळे आम्ही लढत नाही, आम्ही लोकांच्या हिमतीवर आम्ही लढतो. भाजपसोबत गेल्यावर त्यांना भाजपचीच स्क्रिप्ट वाचावी लागतीयं, मुख्यमंत्री शिंदेसोबत आणि अजितदादांसोबतही तेच होतं असल्याचंही पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, भीमथडी जत्रेला लोकांचा उत्साह वाढला असून या उपक्रमाला येणाऱ्यांची संख्या वाढतेयं. सामाजिक दृष्टीकोनातून हा महत्वपूर्ण उपक्रम असल्याचंही रोहित पवार यांनी यावेळी नमूद केलं आहे. तसेच या कार्यक्रमाला कोणालाही निमंत्रित करत नसतो. अनेक नेते काही लोकं व्यस्त असतील म्हणून ते नसतील आले, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केलीयं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube