People Lost 4245 Crore In 10 Months By Scammers According To Govt Data : गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ होत असून, दिवसागणिक ही आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे. दररोज कोणी ना कोणी सायबर गुन्हेगारांच्या (Cyber Crime) जाळ्यात अडकत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दहा महिन्यात सायबर चोरट्यांनी नागरिकांना तब्बल 4, 245 कोटींची रक्कम लुटली आहे. याबाबत अर्थमंत्रायाने (Finance Ministry) राज्यसभेत नुकतीच आकडेवारी सादर केली आहे. २०२४-२५ च्या पहिल्या १० महिन्यांत डिजिटल आर्थिक फसवणुकीमुळे लोकांना ४२४५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
1 एप्रिलपासून लागू होणार युनिफाइड पेन्शन योजना; ‘या’ लोकांना मिळणार 50% पेन्शन हमी
तोटा ६७% वाढला
२०२२-२०२३ मध्ये २० लाख (सुमारे २० लाख) प्रकरणे नोंदवली गेली ज्यात लोकांना २५३७ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्याच वेळी, २०२३-२०२४ मध्ये, आर्थिक फसवणुकीची २८ लाखांहून अधिक प्रकरणे उघडकीस आली ज्यात घोटाळेबाजांनी लोकांच्या खात्यातून ४४०३ कोटी रुपये चोरले.
अर्थ मंत्रालयाने सांगितले की, रिझर्व्ह बँकेने पेमेंटशी संबंधित फसवणुकीसाठी फसवणूक अहवाल प्रणाली तयार केली आहे. बँका, नॉन-बँक प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट जारीकर्ते आणि नॉन-बँक क्रेडिट कार्ड जारीकर्ते या प्रणालीद्वारे फसवणुकीच्या घटनांची तक्रार करू शकतात.
घोषणा लिहीलेले टी शर्ट अन् संसदेचं कामकाज झालं ठप्प; सभागृहात नेमकं काय घडलं?
सरकारने वाटचले ४३८६ कोटी रुपये
आर्थिक फसवणुकीची त्वरित तक्रार करण्यासाठी आणि फसवणूक करणाऱ्यांना निधीची चोरी करण्यापासून रोखण्यासाठी सिजिटन फायनान्शियल सायबरफ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम सुरू करण्यात आल्याचे सरकारक़ून सांगण्यात आले. ज्याअंतर्गत आतापर्यंत, १.३ दशलक्ष तक्रारींच्या आधारे या प्रणालीद्वारे सुमारे ४३८६ कोटी रुपयांची लूट थांबवण्यात यश आले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की, डिजिटल आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सरकार, आरबीआय आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले, राज्याची आर्थिक..
ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?
जर तुम्हालाही ऑनलाइन घोटाळे टाळायचे असतील तर, काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. यात प्रामुख्याने संशयास्पद ईमेल आणि संदेशांवर क्लिक करण्याची चूक करू नका. याशिवाय, तुम्ही उघडत असलेली वेबसाइट खरोखरच विश्वसनीय आहे की, नाही याची पडताळणी करा. तुमच्या खात्यासाठी एक मजबूत पासवर्ड तयार करा जो सहज अंदाज लावता येणार नाही.
1 एप्रिलपासून लागू होणार युनिफाइड पेन्शन योजना; ‘या’ लोकांना मिळणार 50% पेन्शन हमी
ऑनलाइन घोटाळ्याची तक्रार कुठे कराल
जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीसोबत ऑनलाइन घोटाळा झाल्यास १९३० (सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर) वर कॉल करून आणि तुमच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती देऊन तक्रार नोंदवू शकता.
आज #राज्यसभा में माननीय सदस्यों द्वारा पूछे गए डिजिटल फ्रॉड से संबंधित सवालों का विस्तारपूर्वक उत्तर दिया। #PankajChaudhary#ParliamentSession2025#BudgetSession2025#DigitalFraud #RajyaSabha @BJP4India @narendramodi @FinMinIndia @mygovindia @BJP4UP pic.twitter.com/m5VcZ9Nznz
— Pankaj Chaudhary (@mppchaudhary) March 18, 2025