Monsoon In India : नैऋत्य मोसमी पावसाने देशाच्या दक्षिणेकडील भागाकडे कूच केली आहे. त्याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. रविवारपर्यंत मान्सून मालदीव, निकोबार द्वीपसमूह, कोमोरिन क्षेत्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागात पुढे सरकला आहे. तसंच, मान्सून 31 मे’पर्यंत केरळमध्ये पोहोचेल. चार दिवसांनंतर 1 जूनच्या आसपासच्या मॉन्सून बंगालच्या उपसागरात आणि अंदमानमध्ये 19 मे रोजी पोहचणार आहे. तसंच, कर्नाटकात 3 ते 8 जून दरम्यान आणि महाराष्ट्रात 9 ते 16 जूनपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गुडन्यूज! मान्सूनची आज अंदमानात एन्ट्री; यंदा धो-धो बरसणार
सरासरीपेक्षा जास्त पाऊस
27 जूनपासून दिल्लीला उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. रविवार, 19 मे रोजी, हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून, पुढील दोन दिवसांत दिल्लीच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेचा अंदाज वर्तवला आहे. काल शनिवार दिल्लीमध्ये हंगामातील सर्वात उष्ण दिवस होता. तसंच, तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. केरळमध्ये 18 जून 1972 रोजी सर्वात उशीर झाला होता. त्यानंतर शक्यतो मान्सून वेळेवर येत असल्याचा इतिहास आहे. या वर्षीच्या मान्सूनच्या हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Monsoon Arrival Update : दिलासा मिळणार दिवशी केरळात दाखल होणार मान्सून
शेतीची काम
भारताच्या शेतीसाठी मान्सून महत्त्वाचा आहे. अर्ध्याहून अधिक लागवडीखालील जमीन त्यावर अवलंबून आहे. हे पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेले जलाशय देखील भरून काढते. खरीप पिकांच्या पेरणीसाठी जून आणि जुलै हे महिने विशेष महत्त्वाचा आहे. या महिन्यात भारतात शेतीची मोठ्या प्रमाणात काम सुरू होतात. त्यामुळे पाऊस मागे-पुढे झाला तर शेतीचं मोठ नुकसान होतं.