Download App

Monsoon Arrival Update : दिलासा मिळणार ! ‘या’ दिवशी केरळात दाखल होणार मान्सून

Monsoon Arrival Update : उन्हाळ्यामुळे देशातील बहुतेक भागात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील

Monsoon Arrival Update : उन्हाळ्यामुळे देशातील बहुतेक भागात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक शहरात 40 अंशापेक्षा जास्त तापमान असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. यामुळे लोक आतुरतेने मान्सूनची (Monsoon ) वाट पाहत आहे. यातच भारतीय हवामान विभागाने एक दिलासादायक बातमी दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी देशात मान्सून लवकरच एंट्री करणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
मागील वर्षी देशात 8 जून रोजी मान्सूनची एंट्री झाली होती. मात्र यावर्षी दक्षिण अंदमानच्या समुद्रात 19 मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे यंदा मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे.
तर या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वी वर्तवला होता. गेल्या महिन्यात (एप्रिल 2024) भारतीय हवामान विभागाने पहिला अंदाज वर्तवला होता त्यामध्ये यंदा देशात 106 टक्के पाऊस पडणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
प्रज्वल रेवण्णा, महागाई अन् कांद्यावरून अमोल कोल्हेंचा मोदींवर घणाघात
एल निनो कमजोर होत असल्याने देशात यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर आता भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्रात देखील यावेळी मान्सून चांगला राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
देशात CAA लागू झाल्यानंतरची पहिली मोठी बातमी! 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व
follow us

वेब स्टोरीज