प्रज्वल रेवण्णा, महागाई अन् कांद्यावरून अमोल कोल्हेंचा मोदींवर घणाघात

प्रज्वल रेवण्णा, महागाई अन् कांद्यावरून अमोल कोल्हेंचा मोदींवर घणाघात
Amol Kolhe On Narendra Modi : महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagre) यांच्या प्रचारार्थ आज शरद पवारांनी (Sharad Pawar) दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha) जाहीर सभा घेतली. यावेळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) देखील उपस्थित होते. या जाहीर सभेत अमोल कोल्हे यांनी जोरदार फटकेबाजी करत भाजपसह नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली.
या सभेत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, भाजपने प्रज्वल रेवण्णा सारख्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. प्रज्वल रेवण्णाने 250-300 महिलांचा बलात्कार केला त्याला जिंकून देण्यासाठी मोदींनी प्रचार देखील केला. यामुळे भाजपमध्ये नौतिकता आहे का ? याचा विचार आता जनतेला करण्याची गरज आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
तर कांद्याच्या प्रश्नावरून देखील अमोल कोल्हे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अमोल कोल्हे म्हणाले, डिसेंबर 2023 मध्ये कांद्याला40-45 रुपये भाव होता मात्र आज 12-15 रुपये आहे. 2014 मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले होते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार मात्र आज शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालं का? असा प्रश्न उपस्थित करत यांनी मोदी सरकारवर टीका केली.
अमोल कोल्हे पुढे म्हणाले, मी आणि सुप्रिया सुळेंनी संसेदत कांद्याच्या भावाबद्दल प्रश्न उपस्थित करत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला होता मात्र  महायुतीच्या खासदारांनी एकही प्रश्न विचारले नाही. मग त्यांना मत का ? द्याचा याचा विचार आज करण्याची गरज आहे, असं देखील अमोल कोल्हे म्हणाले.
या मतदारसंघात आज महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते, त्यांनी 2014 मध्ये सांगतिले होते की, मतदान करण्यापूर्वी गॅस सिलेंडरला नमस्कार करा आणि मग मतदान करा. यामुळे तुम्ही देखील 20 मे ला मतदान करताना तीन वेळा गॅस सिलेंडरला नमस्कार करा आणि मतदान करा कारण 400 रुपयांचा सिलेंडर आज 1200 रुपयांना मिळत आहे.  यामुळे 20 मे ला महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना जास्तीत जास्त मतांनी विजय करा असा आवाहन त्यांनी यावेळी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज