देशात CAA लागू झाल्यानंतरची पहिली मोठी बातमी! 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व

देशात CAA लागू झाल्यानंतरची पहिली मोठी बातमी! 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व

Citizenship Amendment Act : मोदी सरकारने (Modi Government) काही दिवसांपूर्वी देशात CAA कायदा (Citizenship Amendment Act) लागू केला होता आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर आता देशात पहिल्यांदाच 14 जणांना केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय नागरिकत्व (Indian Citizenship) दिले आहे.

गृहसचिव अजय भल्ला यांच्या हस्ते या 14 लोकांना नागरिकत्व बहाल करण्यात आली आहे. 11 मार्च रोजी केंद्र सरकारने CAA बद्दल अधिसूचना जारी केली होती त्यानंतर लोकांनी पोर्टलवर भारतीय नागरिकत्वासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. यानंतर गृह मंत्रालयाकडून या लोकांच्या अर्जाची छाननी करून आता या लोकांना नागरिकत्वाचं प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

या 14 लोकांना नागरिकत्व दिल्यानंतर आता CAA कायदाअंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात अत्याचाराला बळी पडून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम स्थलांतरितांना देखील नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने ज्या 14 जणांना भारतीय नागरिकत्व दिले आहे त्यामध्ये हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समाजातील लोकांचा समावेश आहे. मोदी सरकारने डिसेंबर 2019 मध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये अत्याचाराला बळी पडून 31 डिसेंबर 2014 किंवा त्यापूर्वी देशात आलेल्या बिगर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी CAA कायदा आणला होता. तेव्हा या कायद्याविरोधात देशात विरोधी पक्षांसह अनेक जणांनी विरोध दर्शवला होता.

मोदींच्या मनात भिती, निवडणुकीत भाजपची वाईट परिस्थिती, रोहित पवारांचं भाकीत

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि पारशी धर्मातील लोकांना CAA कायदाअंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज