मोदींच्या मनात भिती, निवडणुकीत भाजपची वाईट परिस्थिती, रोहित पवारांचं भाकीत

मोदींच्या मनात भिती, निवडणुकीत भाजपची वाईट परिस्थिती, रोहित पवारांचं भाकीत

Rohit Pawar On Narendra Modi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिक मतदारसंघात (Nashik Lok Sabha) जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी शरद पवारांसह (Sharad Pawar) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली. आता त्यांच्या टीकेला कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) उत्तर देत तुमच्या सरकारने गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे बोलावा असा प्रश्न विचारात जोरदार हल्लाबोल केला आहे.

नाशिक येथे आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये आमदार रोहित पवार म्हणाले, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 13 लाख मतदार कांदा उत्पादक शेतकरी आहे जर आजच्या सभेसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बंदी घालण्यात आली असेल तर आता मोदींचा आणि भाजपचा विश्वास मतदारांवर देखील राहिलेला नाही असं म्हणत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

पंतप्रधान मोदींनी आज नाशिक मतदारसंघात फक्त शो बाजी करायची होती त्यांना आम्ही सभा घेऊ शकतो हे दाखवायचं होतं. आजच्या सभेत धुळे, नगरहून लोकं आणली गेली असल्याचा आरोप देखील रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला.

पुढे बोलताना रोहीत पवार म्हणाले, मतदार कमी आणि कार्यकर्ते काही प्रमाणात अशी परिस्थिती मोदींच्या आजच्या सभेची होती. मोदींच्या आजच्या सभेत कुठेही उत्साह नव्हता, मोदींनी देखील भाषण आवरते घेत तिथून काढता पाय घेतला असल्याची टीका रोहित पवारांनी केली.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देत रोहित पवार म्हणाले, मोदींनी गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीच केला नाही. आज शेतमालाला भाव नाही, देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काय केलं हे बोलायला हवं होतं असं रोहित पवार या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

तर 4 जूनला असली कोण आणि नकली कोण हे आपल्याला कळेल असं म्हणत असली लोक हे मतदार आहेत आणि ते लोक आमच्या पाठीमागे आहेत . त्यामुळे महाविकास आघाडीलाच भरघोस यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राहुल द्रविडनंतर मुख्य प्रशिक्षक कोण? ‘हे’ नाव आहे आघाडीवर

आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यातील मतदानात भाजप आणि मित्र पक्षांची अतिशय वाईट परिस्थिती झाली आहे यामुळे मोदींना भीती आहे. सर्वेमध्ये भाजपची पीछेहाट होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी सुरुवात विकासावर केली त्यानंतर हिंदू मुस्लिमवर आले नंतर भटकती आत्मावर आले नंतर अदानी अंबानीवर आले आणि आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ते आमच्याकडे या असं सांगत आहे. यामुळे त्यांच्या या निवडणुकीत पराभव होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube