राहुल द्रविडनंतर मुख्य प्रशिक्षक कोण? ‘हे’ नाव आहे आघाडीवर

राहुल द्रविडनंतर मुख्य प्रशिक्षक कोण? ‘हे’ नाव आहे आघाडीवर

Indian Team Head Coach :  भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ टी-20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) संपणार असल्याने भारतीय क्रिकेट संघाला (Team India) आता लवकरच नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. मुख्य प्रशिक्षकासाठी बीसीसीआयकडून (BCCI) अर्ज देखील मागविण्यात येत आहे.  बीसीसीआयने सोमवारी 3.5 वर्षांच्या कालावधीसाठी अर्ज मागविले आहे. अर्जदारांना 27 मेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण, गौतम गंभीरसह जस्टिन लँगर आणि स्टीफन फ्लेमिंग यांच्या नावाची जोरात चर्चा होत आहे. यामुळे भारतीय संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मण

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक असण्याची शक्यता नाकारल्याने या पदासाठी जर भारताचा माजी खेळाडू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी अर्ज केले तर त्यांची निवड होण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत व्हीव्हीएस लक्ष्मणने आशियाई गेम, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि आयर्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेदरम्यान मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडली आहे.

गौतम गंभीर

राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नावाची देखील चर्चा होत आहे. गंभीर सध्या आयपीएलमध्ये केकेआरच्या मेंटॉरची जबाबदारी पार पाडत आहे. केकेआर आयपीएलमध्ये  गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यामुळे गौतम गंभीरच्या नावाची देखील बीसीसीआय विचार करत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

जस्टिन लँगर

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी यावेळी भारतीय संघासाठी परदेशी प्रशिक्षकाची निवड करण्यात येऊ शकते असे संकेत दिल्यानंतर  टी-20 विश्वचषक विजेते ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगर (Justin Langer) यांच्या नावाची देखील आता चर्चा सुरु आहे.

प्रेक्षकांनो, तयार व्हा ‘मल्हार’ येतोय 31 मे रोजी भेटीला; हिंदी, मराठीमध्ये होणार प्रदर्शित

स्टीफन फ्लेमिंग

तर जस्टिन लँगर व्यतिरिक्त परदेशी प्रशिक्षक म्हणून स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांच्या नावाची देखील चर्चा होत आहे . स्टीफन फ्लेमिंग आयपीएलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सीएसकेचे प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. यामुळे राहुल द्रविडनंतर कोणाला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक होण्याची संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज